मॅनफोर्स कंडोम बनविणाऱ्या मॅनकाइंड फार्माचा IPO बाजारात येणार, सविस्तर अपडेट जाणून घ्या

मॅनफोर्स कंडोम बनविणाऱ्या मॅनकाइंड फार्माचा IPO बाजारात येणार, सविस्तर अपडेट जाणून घ्या

Rate this post

Mankind Pharma IPO: कंडोम ब्रँडपैकी एक असलेल्या मॅनफोर्सची मूळ कंपनी मॅनकाइंड फार्माचा आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. यासाठी प्राइस बँडदेखील निश्चित करण्यात आली आहे. या कंपनीला शेअर बाजारातून 4 हजार 326 कोटी गुंतवणूक अपेक्षित असून यासाठी आयपीओसाठी 1026-1080 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. पुढच्या आठवड्यात 25 एप्रिलला मॅनकाइंड या कंपनीचा आयपीओ खुला होईल.

आयपीओ पूर्ण तपशील

आयपीओ 24 एप्रिल रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. त्यानंतर सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी  25 एप्रिल रोजी सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी सुरू होईल आणि 27 एप्रिल रोजी सबस्क्रिप्शन बंद होईल. कंपनीने प्रति शेअर 1,026 ते 1,080 च्या रेंजमध्ये किंमत बँड निश्चित केला आहे. 4 कोटी इक्विटी शेअर्सची विक्री याकरिता केली जाणार आहे.

Also Read  Kia EV6 Booking : तुम्ही किआ ईव्ही 6 (EV6) घेण्याचा विचार करताय? तर पटकन बुक करा 

ग्रे मार्केटमध्ये काय परिस्थिती?

बुधवारी ग्रे मार्केटमध्ये मॅनकाइंड फार्माचे शेअर्स 80 रुपयाच्या प्रीमियमवर (GMP) उपलब्ध आहेत. कंपनीचे शेअर्स 9 मे 2023 रोजी स्टॉक एक्सचेंज BSE आणि NSE वर सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे असं निरीक्षण बाजार निरीक्षकांनी नोंदवलं आहे.

ऑफर फॉर सेल काय?

मुळची दिल्लीमधली असलेल्या या औषध निर्मात्या कंपनीनं सुमारे4 हजार 326.36 कोटी उभारण्याची योजना आखली आहे. यानुसार रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) नुसार कंपनीचा आयपीओ हा प्रवर्तक आणि इतर विद्यमान भागधारकांद्वारे 40,058,844 इक्विटी समभागांच्या विक्रीसाठी (OFS) पूर्णपणे ऑफर आहे.

Also Read  Petrol-Diesel Price Today, April 28:देशात सर्वात स्वस्त, महाग पेट्रोल-डिझेल कुठे मिळतंय? पाहा आजचे दर

ओएफएसमध्ये शेअर्स विकणारे प्रवर्तक रमेश जुनेजा, राजीव जुनेजा आणि शीतल अरोरा आहेत. याशिवाय, केर्नहिल CIPEF, Cairnhill CGPE, Beige Limited आणि Link Investment Trust OFS मध्ये सहभागी होतील.हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल असल्याने कंपनीला इश्यूमधून कोणतीही निव्वळ रक्कम मिळणार नाही आणि संपूर्ण निव्वळ उत्पन्न विक्री करणाऱ्या भागधारकांकडे जाईल.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, अॅक्सिस कॅपिटल, IIFL सिक्युरिटीज, जेफरीज इंडिया आणि जेपी मॉर्गन इंडिया या इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत.

Also Read  IPL 2023 Orange Cap and Purple Cap :डु प्लेसिस ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल, मोहम्मद शमीचा पर्पल कॅपवर कब्ज: टॉप 5 खेळाडूंची यादी

कंपनीबद्दल तपशील

मॅनकाइंड फार्मा विविध श्रेणीतील फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन विकसित, उत्पादन आणि विपणन करण्यात गुंतलेली आहे. कंडोम, गर्भधारणा ओळखणे अर्थात प्रेग्नन्सी टेस्ट कीट, आपत्कालीन गर्भनिरोधक, अँटासिड पावडर, जीवनसत्व आणि खनिज पूरक आणि पुरळ प्रतिबंधक श्रेण्यांमध्ये अनेक भिन्न ब्रँड्स स्थापित केले आहेत. त्याची संपूर्ण भारतातील विपणन उपस्थिती आहे आणि कंपनीच्या देशभरात 25 उत्पादन सुविधा कार्यरत आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत फर्मकडे 600 हून अधिक शास्त्रज्ञांची एक टीम आणि आईएमटी मानेसर, गुरुग्राम (हरियाणा) आणि ठाणे (महाराष्ट्र) येथे चार युनिट असलेले एक समर्पित इन-हाउस संशोधन-विकास केंद्र आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?