कच्च्या तेलात किंचित घसरण; देशात पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिरच, झटपट पाहा Latest Price

कच्च्या तेलात किंचित घसरण; देशात पेट्रोल-डिझेलचे दर मात्र स्थिरच, झटपट पाहा Latest Price

Rate this post

Petrol Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींच्या (Crude Oil) आधारावर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवे दर भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता अपडेट करतात. असं असलं तरी, देशात इंधन किमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. मात्र कच्च्या तेलाच्या किमतींत सातत्यानं चढ-उतार होत आहेत.

आज 14 एप्रिल रोजीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. जवळपास 10 महिन्यांपासून दर स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आहे, तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

Also Read  कच्च्या तेलाच्या दरांत कपात; देशातही पेट्रोल-डिझेलचे दर बदलणार?

कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित घसरण

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. काल म्हणजेच, गुरुवारी कच्च्या तेलाच्या किमतींनी प्रति बॅरल 87 डॉलरचा टप्पा पार केला होता. आज (14 एप्रिल) त्यामध्ये किंचित घट झाली आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Prices) कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील विविध शहरांमध्ये वाहनांच्या इंधनाचे दर सारखेच आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात आज 14 एप्रिल रोजी ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल 86.46 डॉलर आहे. तसेच, WTI क्रूड प्रति बॅरल 82.54 डॉलरवर आहे. जाणून घेऊया, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत.

Also Read  Petrol Diesel Rates Today: कच्च्या तेलाचे दर गडगडले Petrol Diesel लवकरच स्वस्त होणार?

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत का होतात बदल? 

मूल्यवर्धित कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी विविध बाबींवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. इंधन दरांमध्ये शेवटचा देशव्यापी बदल गेल्या वर्षी 21 मे रोजी झाला होता, जेव्हा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटर कपात केली होती.

रोज अपडेट होतात पेट्रोल-डिझेलचे दर

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांच्यासह सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या (OMCs) आंतरराष्ट्रीय बेंचमार्क किमती आणि परकीय चलन दरांच्या अनुषंगाने दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमतींत सुधारणा करतात.

Also Read  पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिरच; 16 राज्यात अद्यापही पेट्रोल शंभरीपार

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?