WhatsApp Update : आता व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. व्हॉट्सअॅपकडून आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. त्यामुळे हे मेसेजिंग अॅप सर्व वयोगटातील लोकांमध्ये लोकप्रिय आहे. यामागे अॅप युजरफ्रेंडली कसे रााहिल, याचा कंपनीकडून विचार केला जातो. आता वॉटसअॅप एक नवीन फिचर्स ( hatsApp new feature) घेऊन येणार आहे. जे व्हॉट्सअॅप युजर्ससाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. आता या नवीन फिचरमुळे व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज डिलिट न करता ए़डिट करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे युजर्सना मेसेज एडिट आणि सेव्ह करण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. याशिवाय युजर्सना व्हॉट्सअॅपवर आपले कॉन्टॅक्ट्स सेव्ह आणि एडिट करण्यासाठी करण्यासाठी या फिचर्सचा चांगला उपयोग होणार आहे. लवकरच सगळ्या युजर्ससाठी हे फिचर मिळणार आहे. सध्या बीटा व्हर्जनवर याची चाचणी सुरू आहे.
असे आहे हे नवीन व्हॉट्सअॅप फिचर
सध्या व्हॉट्सअॅपमध्ये समोरच्याला पाठवलेला मेसेज डिलिट करण्यासाठी मेसेज सिलेक्ट करून Delete For Everyone पर्याय उपलब्ध आहे. यामुळे पूर्ण मेसेज डिलिट होतो. पण या नवीन फिचरमुळे एडिट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या नवीन फिचर्समुळे युजर्सकडून समोरच्याला पाठवलेला मेसेज डिलिट करायची आवश्यकता नाही. आपल्याकडून पाठवण्यात आलेल्या मूळ मेसेजमधील शब्द नको असलेले शब्द, वाक्य डिलिट करता येणार आहेत. तसेच एडिट करताना नवीन शब्दांची भर टाकण्याची सुविधा मिळणार आहे. युजर्सने पाठवलेला मेसेज एका ठराविक वेळेच्या आत एडिट करावा लागणार आहे. यासाठी युजर्सने पाठवलेला मेसेज 15 मिनिटाच्या आत एडिट करता येण्याची सुविधा उपलब्ध मिळणार आहे. त्यामुळे हे वॉट्सअप फिचरही व्हॉट्सअॅप युजर्सना प्रचंड पसंत पडणार आहे.
या फिचरमुळे युजर्सना त्यांचा मेसेज ए़डिट आणि सेव्ह करता येणार आहे. ही सर्व प्रकिया व्हॉट्सअॅपवर सेंड करण्यात आलेल्या मेसेजशी संबंधित आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींना, शिक्षक आणि आई-बाबांना, नातेवाईकांना अनावधानाने चुकीचा मेसेज सेंड करतो. हा चुकीचा मेसेज समोरच्याला गेल्यामुळे आपल्यातील बहुतेकांची कधी ना कधी ना तारांबळ उडीली असणार. तसेच मेसेज पाठवण्यामागील हेतू चांगला असून काही वेळा काही शब्दांमुळे गैरसमज निर्माण होत असतात. समोरच्याला कितीही स्पष्टीकरण दिले तरी गैरसमज दूर होत नाहीत. या नवीन फिचरमुळे व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेज डिलिट न करता त्यातील शब्द एडिट करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे झालेली चुक दुरूस्त करण्याची संधी व्हॉट्सअॅप युजर्सना मिळणार आहे. पण यासाठी आणखीन काही काळ वाट पाहावी लागणार आहे. याचे कारण सद्या हे नवीन फिचर प्रगतीपथावर आहे. पण हे नवीन फिचर सध्या प्राथमिक अवस्थेत असून सर्वांना कधी उपलब्ध होईल याची माहिती देण्यात आली नाही.