आजही पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा, उष्णतेत वाढ होण्याची शक्यता 

आजही पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा, उष्णतेत वाढ होण्याची शक्यता 

Rate this post

Maharashtra Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कधी अवकाळी पाऊस ( Unseasonal rain) पडत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. आजही राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील (western Maharashtra) सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यासह मराठवाड्यातील (Marathwada) लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाची शक्यता जाणवत आहे.

Also Read  RR vs SRH, IPL 2023 : थरार...! अखेरच्या चेंडूवर षटकार, हैदराबादचा राजस्थानवर 4 विकेटने विजय

दरम्यान, आजपासून (16 एप्रिल) संपूर्ण महाराष्ट्रात अपेक्षित असलेलं अवकाळी वातावरण निवळण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणातील चार आणि विदर्भातील 11 अश्या एकूण 15 जिल्ह्यात 16 आणि 17  तारखेला वातावरण निवळण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील 10,  मराठवाड्यातील 8 अशा एकूण 18 जिल्ह्यात अजुनही रविवार 23 एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता टिकून असल्याचे खुळे यांनी सांगितले.

Also Read  नेटफ्लिक्सकडून गिफ्ट! 116 देशांमध्ये सब्सक्रिप्शन दरात घट; भारताचं काय?

उष्णतेत वाढ होण्याची शक्यता

मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी होणारा पूर्व-मोसमी (15 ते 20 मे नंतरचा) व सध्याच्या (मार्च-एप्रिल मधील) होणाऱ्या अवकाळी पावसात साध्यर्मता दिसत आहे. मात्र, त्यांचे स्वरूप त्या पाठीमागील वातावरणीय प्रणाली कारणेही पूर्णपणे वेगळी असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले. सध्या महाराष्ट्रात उष्णतेची काहिली वाटत असली तरी सदर तापमान सरासरीइतकेच जाणवत आहे. येत्या एक ते दोन दिवसात या उष्णतेत साधारण तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होवू शकते असा अंदाज माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

Also Read  श्रीगोंदा तालुक्यातल्या युवा शेतकऱ्यानं केली पिवळ्या कलिंगडाची लागवड, शहरी भागात मोठी मागणी

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Rain : नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?