Yashasvi Jaiswal IPL 2023 : यशस्वी जयस्वाल याच्या झंझावाती शतकाच्या बळावर राजस्थानने 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जयस्वाल याने 124 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वाल याचा अपवाद वघळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. यशस्वी जयस्वाल मुंबईच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. यशस्वी जयस्वाल याने संघर्षातून क्रिकेटमध्ये करिअर केलेय. त्याने एकेकाळी मुंबईमध्ये पाणीपुरी विकली.
पहिल्या चेंडूपासून यशस्वी जयस्वाल याने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जयस्वाल याने दमदार शतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरे शतक होय. हॅरी ब्रूक आणि वेंकटेश अय्यर यांच्यानंतर यशस्वी जयस्वाल याने शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, वेकंटेश अय्यर आणि यशस्वी जयस्वाल यांनी मुंबईविरोधात शतकी खेळी केली आहे. यशस्वी जयस्वाल याने आज मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढली. यशस्वी जयस्वाल याने 62 चेंडूत 124 धावांची खेळी केली. या खेळीत जयस्वाल याने 8 खणखणीत षटकार लगावले. त्याशिवाय 16 चौकारही मारले आहेत. यशस्वी जयस्वाल याच्यानंतर राजस्थानकडून सर्वाधिक धावा अतिरिक्त आहेत. 124 धावांची खेळी करत यशस्वी जयस्वाल याने ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. यशस्वी जयस्वाल याने 9 सामन्यात 428 धावांचा पाऊस पाडलाय.
Mumbai ko Pani Puri khilaata tha. Aaj Mumbai ko paani pila diya.
What a boy, what a story!🔥 pic.twitter.com/Na8eMh8wpI
— Sagar (@sagarcasm) April 30, 2023
यशस्वी जयस्वाल याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली. हॅरी ब्रूक याने यंदाच्या आयपीएलमधील पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर वेंकटेश अय्यर याने मुंबईविरोधात वानखेडे मैदानावर शतक ठोकले होते. त्यानंतर यशस्वी जयस्वाल याने आज वानखेडेच्या मैदानावर शतकी खेळी केली. जयस्वाल याने या शतकी खेळीसह ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय.
YASHASVI JAISWAL – THE LONE WARRIOR.
124 (62) with 16 fours and 8 sixes. One of the finest knocks in IPL history, the next best scorer for RR was 18. Single-handedly dominated MI bowlers! pic.twitter.com/UFAyKMC52q
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 30, 2023
Yashasvi Jaiswal the new Orange Cap holder of IPL 2023. pic.twitter.com/Ld3xGoBNML
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 30, 023
Rajasthan Royals batters tonight:
Yashasvi Jaiswal – 124 (62).
All others batters combined – 63 (59).
– One of the finest innings in the IPL! pic.twitter.com/oFuzu7OipF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 30, 2023
यशस्वी जयस्वाल चा ऑरेंज कॅपवर कब्जा –
जयस्वाल याने 124 धावांची शतकी खेळी करत ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवलाय. यशस्वी जयस्वाल याने फाफ डु प्लेसिस याला मागे टाकलेय. यशस्वी जयस्वाल 428 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आठ सामन्यात 422 धावा केल्या आहेत. पंजाबविरोधात नाबाद 92 धावांची खेळी करत डेवेन कॉनवे याने मोठी झेप घेतली आहे. कॉनवे याने 400 धावांचा पल्ला पार केला. डेवेन कॉनवे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात तिसऱ्या क्रमांकावर आहे. डेवेन कॉनवे याने 9 सामन्यात 414 धावा चोपल्या आहेत. ऋतुराज गायकवाड याच्या नावावर 9 सामन्यात 354 धावा आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणारा विराट कोहली पाचव्या क्रमांकावर घसरलाय. विराट कोहलीच्या नावावर 333 धावा आहेत. शुभमन गिल याच्या नावावही 333 धावांची नोंद आहे.
Check Your Internet speed Check Now
Pingback: Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty :सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये 58 वर्षांनंत
Pingback: Latest News:तुम्हीही ऑनलाइन जॉब स्कॅमचा भाग बनताय का? झिरोधाच्या संस्थापकांनी शेअर केला धक्कादायक प्र