WTC Final : ऋतुराज, सूर्यकुमार अन् मुकेश कुमारलाही मिळाले इंग्लंडचे तिकिट

WTC Final : ऋतुराज, सूर्यकुमार अन् मुकेश कुमारलाही मिळाले इंग्लंडचे तिकिट

Rate this post

WTC final, Standby players, Ruturaj Gaikwad : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलसाठी ईशान किशन याला संधी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त केएल राहुलच्या जागेवर ईशानची वर्णी लागली आहे. आज बीसीसीआयने अधिकृत माहिती दिली. त्याशिवाय सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार यांनाही इंग्लंडला पाठवण्यात येणार आहे. या तिन्ही खेळाडूंना स्टँडबाय खेळाडू म्हणून टीम इंडियात स्थान मिळालेय.

ऋतुराज भन्नाट फॉर्मात –

चेन्नई सुपर किंग्सचा सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड यंदा दमदार फॉर्मात आहे. फक्त आयपीएल नव्हे तर देशांतर्गत क्रिकेटमध्येही धावांचा पाऊस पाडलाय. आयपीएलमध्ये 11 सामन्यात त्याने 42 च्या सरासरीने 384 धावा केल्या आहेत. ऋतुराज चेन्नईला दमदार सुरुवात देत आहे. ऋतुराज गायकवाड याने आतापर्यंत एकाही कसोटी सामना खेळलेला नाही.

Also Read  Team of the Week: ऋतुराजची सलामी अन् मार्क वूडचा भेदक मारा, या आठवड्यात 11 खेळाडूंनी मारली बाजी

सूर्या तळपतोय

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला आयपीएलच्या सुरुवातीला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पण मागील काही सामन्यात सूर्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडतोय. सूर्याने दहा सामन्यात 29 च्या सरासरीने 293 धावा केल्या आहेत. सूर्याने आतापर्यंत एक कसोटी सामना खेळला आहे. यामध्ये त्याला फक्त आठ धावा काढता आल्या आहेत.

दिल्ली कॅपिट्लसाच मुकेश कुमार यालाही स्टँडबाय खेळाडू म्हणून निवडण्यात आलेय. मुकेश कुमार याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याशिवाय आयपीएलमध्येही त्याने भेदक मारा केला आहे. याचेच फळ मुकेश कुमार याला मिळालेय. मुकेश कुमार टीम इंडियासोबत लंडनला रवाना होणार आहे.

Also Read  IPL 2023, MI vs RCB: वानखेडेवर सूर्या तळपळला, मुंबईचा आरसीबीवर सहा विकेटने विजय

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ‘द ओव्हल’ येथे खेळवण्यात येणार आहे. 7 जून, 2023 पासून सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे संघ ठरले, ठिकाण ठरलं आणि दिवसही ठरला, मग आता विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपसाठी टीम इंडिया  India’s squad for WTC final : 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर,  मोहम्द शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव,  जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर)

Also Read  (Renewed) Dell Optiplex Desktop Computer PC (Intel Core i5 4th Gen, 8 GB RAM, 256 GB SSD, Windows 10 Pro, MS Office, Intel HD Graphics, USB, Ethernet, VGA), Black

Standby players: ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार.

 ऑस्ट्रेलियाचा संघ –

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

freelancing साईटवरून पैसे कमवण्याच्या विविध पद्धती 

 

1 thought on “WTC Final : ऋतुराज, सूर्यकुमार अन् मुकेश कुमारलाही मिळाले इंग्लंडचे तिकिट”

  1. Pingback: Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana:फक्त 436 रुपयात दोन लाखांचा विमा; केंद्र सरकारची ही भन्नाट पॉलिसी - आपला अभ्यास- Aplaabhyas

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?