World Red Cross Day 2023:  आज जागतिक वर्ल्ड  रेड क्रॉस डे, काय आहे इतिहास?

 World Red Cross Day 2023: आज जागतिक वर्ल्ड रेड क्रॉस डे, काय आहे इतिहास?

Rate this post

 World Red Cross Day 2023: संपूर्ण जगभरात 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस डे (World Red Cross Day) साजरा केला जातो. रेड क्रॉसचे संस्थापक यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो. हेन्नी ड्युएंट हे रेड आतंरराष्ट्रीय क्रॉस समितीचे संस्थापक होते. त्यांच्या जयंतीनिमित्त (Birth Anniversary) हा रेड क्रॉस डे साजरा केला जातो. हेन्नी ड्युएंट (Henry Dunant) यांना शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता. तसेच जागतिक रेड क्रॉस डे हा रेड क्रेसेंट डे म्हणून देखील साजरा केला जातो. आतंतराष्ट्रीय रेड क्रॉस हे जगभरात मानवतावादी कार्य करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते.

Also Read  पाणी टंचाई! जालन्याच्या अंबड तालुक्यातील 17 गावांमध्ये पाणी उपसा करण्यास बंदी

काय आहे या दिवसाचा इतिहास?

स्विस उद्योगपती जीन हेन्री ड्युनंट यांनी 1859 मध्ये इटलीमधील सॉल्फेरिनोची लढाई पाहिली. ज्यामध्ये मोठ्या संख्येने सैनिक मरण पावले आणि जखमी झाले. जखमी सैनिकांची काळजी घेण्यासाठी कोणत्याही सैन्याकडे कोणती ड्युनंटने स्वयंसेवकांचा एक गट तयार केला ज्यांनी युद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी अन्न आणि पाणी आणले. एवढेच नाही तर या गटाने त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना पत्रेही लिहिली.

 या घटनेनंतर तीन वर्षांनी हेन्रीने आपला अनुभव ‘अ मेमरी ऑफ सॉल्फेरिनो’ या पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केला. पुस्तकात त्यांनी कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय समाज स्थापन करण्याची सूचना केली आहे. युद्धात जखमी झालेल्यांवर उपचार करू शकणारा समाज. जो कोणत्याही देशाच्या नागरिकत्वाच्या आधारावर नाही तर मानवतावादी विचारांच्या आधारावर लोकांसाठी काम करतो.

Also Read  IPL 2023 Points Table :विजयासह मुंबई आणि पंजाबची गुणतालिकेत उडी; पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर?

या दिवसाचे महत्त्व काय? 

कोणत्याही कठीण परिस्थितीच्या काळात रेड क्रॉसचे स्वयंसेवक नागरिकांच्या मदतीला धावून येतात. तसेच रेडक्रॉसचा उद्देश कोणताही भेदभाव न करता माणुसकीच्या नात्याने लोकांना मदत करणे हा आहे. आस्मानी आणि मानवनिर्मित संकटांच्या काळात लोकांना मदत करणाऱ्या या संस्थेशी अनेक लोक जोडले गेले आहेत. जागतिक रेडक्रॉस दिवसाला खूप महत्त्व आहे. कारण हा दिवस मानवतावादी विचारांना प्राधान्य देणाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करतो.

रेड क्रॉस दिनाची यंदाची थीम

“आपण जे काही करतो ते हृदयातून येते” ही यंदाच्या रेड क्रॉस दिनाची थीम आहे. याचा उद्देश इतकाच आहे की, जे निस्वार्थपणे लोकांची मदत करण्यासाठी पुढे आले आहेत त्यांचा सन्मान करणे.

Also Read  Medicine:48 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल, तुम्ही घेत असलेली औषधं यापैकीच तर नाही ना? तपासून पहा

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mother’s Day 2023: मातृदिन म्हणजे नक्की काय? कशी झाली मातृदिन साजरी करण्याची सुरुवात? पाहा…

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

freelancing साईटवरून पैसे कमवण्याच्या विविध पद्धती 

ब्लॉगिंग की शुरुआत कहाँ से करें?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?