White Jamun Benefits:उन्हाळ्याच्या दिवसात पांढऱ्या जांभळापासून मिळू शकतात अनेक आरोग्यदायी फायदे

White Jamun Benefits:उन्हाळ्याच्या दिवसात पांढऱ्या जांभळापासून मिळू शकतात अनेक आरोग्यदायी फायदे

Rate this post

White Jamun Benefits:  सध्या कडक उन्हाळा  आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात काळया जांभळांची विक्री केली जाते. कारण जांभळं खाण्यामुळे अनेक फायदे मिळतात. तसेच जांभूळ चवीला गोड आणि चांगलं लागतं. पण बहुतेक लोकांना काळ्या जांभळाची माहिती असते पण पांढऱ्या जांभळाबद्दल कुणालाही माहिती नसते. पांढऱ्या जांभळापासून अनेक आरोग्यदायी फायदे (White Jamun Benefits) मिळतात आणि हे अत्यंत गुणकारी फळ आहे. या जांभळाला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. यामध्ये वॅक्स अॅपल, जावा अॅपल आणि रोज अॅपल अशा नावांनी ओळखलं जातं. फक्त उन्हाळ्याच्या दिवसा पांढरी जांभळ दिसून येतात.

जांभूळ हे शरीरासाठी अत्यंत  गुणकारी फळ आहे. तसेच त्वचा निरोगी राहण्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे. कारण जांभळामध्ये भरपूर पाणी असतं. त्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. त्यामुळे उन्हाळ्या दिवसात पांढऱ्या जांभळांच आवर्जून सेवन करायला हवं. याचा तुमच्या रोजच्या डाएटमध्येही समावेश केला, तर अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. याबद्दल सविस्तर माहिती जाणून  घेऊया…

Also Read  Buying Pottery:मातीची भांडी किंवा मडके विकत घेण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?

पांढऱ्या जांभळाचे आरोग्यदायी फायदे

1. पांढऱ्या जांभळात भरपूर पाणी असतं. यापासून भरपूर प्रमाणात फायबरही  मिळतं. यामुळे तुमची पचनसंस्था सुधारण्यास मदत मिळते. पोटाशी संबंधित समस्या  आणि बद्धकोष्ठतची समस्या असेल, तर जांभळामुळे दूर होते. आतडयाची जळजळ होत असेल, तर पांढरी जांभळं खाणं फायदेशीर असतं.

2. तुमच्या डोळ्याचं आरोग्य सुधारण्यासाठी चांगलं असतं. कारण पांढऱ्या जांभळापासून व्हिटॅमीन सी भरपूर मिळतं. यामुळे डोळे निरोगी राहण्यासाठी फायदेशीर फळ आहे. जांभळ्याच्या सेवनामुळे तणाव कमी होण्यास मदत मिळते. कारण उन्हाळ्याच्या दिवसात शरीर हायड्रेट राहते आणि दृष्टी सुधारण्यास मदत मिळते. मोतीबिंदूची लक्षणे असतील, तर दूर करण्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे.

3. पांढऱ्या जांभळापासून व्हिटॅमिन सी भरपूर मिळतं. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्सही भरपूर असतात. त्यामुळे फ्री रॅडिकल्सपासून शरीराचं संरक्षण करतात. या रॅडिकल्समुळे त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात आणि अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पांढरी जांभळं आवर्जून खा.

Also Read  Heat Anxiety पासून स्वत: ची कशी काळजी घ्याल?

4. मधुमेही रूग्णांनी पांढऱ्या जांभळाचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असतं. यामुळे शरीरातील रक्ताची आणि साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

5. पांढऱ्या जांभळामध्ये एकूण 93 टक्के पाणी उपलब्ध असतं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शरीर हायड्रेट आणि थंड राहतं. यामुळे तुमचं उष्मघात आणि  डिहायड्रेशन होण्यापासून संरक्षण होतं.

6. या जांभळात कॅलरीच प्रमाण कमी असतं आणि  फायबर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे ओव्हर इंटिंगची समस्या असेल, तर दूर होण्यास मदत मिळते.

7. पांढऱ्या जांभळामुळे गुड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल दूर होतं. तसेच घातक ट्रायग्लिसराईड्स दूर होण्यास मदत मिळतं. त्यामुळे पांढरी जांभळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Also Read  Poco चा नवीन स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या Poco C51 च्या कॅमेरा, बॅटरीसह इतर फीचर्सबद्दल

8. पांढरी जांभळं खाल्ल्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. कारण यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतं. तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत मिळते. जांभळाच्या सेवनामुळे त्वचा तजेलदार होण्यासोबत त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

हे ही वाचा :

Jalna News: पांढऱ्या रंगाच्या जांभळाच्या लागवडीतून लाखोंचे उत्पन्न; शिक्षकाकडून वडिलोपार्जित जमिनीत नवीन प्रयोग, एका एकरात चार लाखांचे उत्पन्न

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

freelancing साईटवरून पैसे कमवण्याच्या विविध पद्धती 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?