WhatsApp Update : इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या युझर्ससाठी भन्नाट फीचर आणणार आहे. यामुळे मेटा युजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी व्हॉट्सअॅप अनेक आकर्षक फीचर्स आणत असते. अशातच व्हॉट्सअॅप युजर्ससाठी नवीन फीचर (Feature) आणत आहे. या भन्नाट फीचरमुळे युजर्स आपले व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status) थेट फेसबुकवर (Facebook) पोस्ट करु शकतात. सध्या व्हॉट्सअॅपकडून या नवीन फीचरवर काम सुरु आहे. हे फिचर लोकांसाठी ‘status privacy’ सेक्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. याठिकाणी युजर्सना स्वत:चे फेसबुक अकाऊंट अॅड (Facebook Account) करता येणार आहे. समजा, जर तुम्हाला व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुकवरही शेअर करावं, असं वाटत असेल तर यासाठी ‘facebook to share’ हा पर्याय ऑन ठेवावा लागणार आहे.
नव फीचर कंटेट क्रिएटर्स आणि इन्फ्लूएन्सर्ससाठी फायदेशीर
या व्हॉट्सअॅप फीचरमधील चांगली गोष्ट म्हणजे युजर्सना आपल्या प्रत्येक स्टोरीसाठी सेटिंग्समध्ये बदल करण्याची सुविधा देण्याता आली आहे. जर तुम्हाला एकच स्टेटस फेसबुकवर शेअर करायचं असेल आणि दुसरं तर तर ही फारच सोप गोष्ट असणार आहे. मात्र, सध्या या फीचरवर काम सुरु असून लवकरच ते लॉन्च होईल. हे फीचर बहुतांश लोकांच्या पसंतीस उतरु शकते. तसेच या फीचरमुळे लोकांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या मित्र परिवाराला अपडेट देण्याची सुविधा उपलब्ध आहे. कंटेट क्रिएटर्स आणि इन्फ्लूएन्सर्ससाठी हे फीचर जबरदस्त फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सअॅप युझर फ्रेंडली बनवण्यासाठी मेटाकडून प्रयत्न
दरम्यान जगभरात दोन बिलियनपेक्षाही जास्त व्हॉट्सअॅप युजर्स आहेत. तसेच व्हॉट्सअॅप जास्तीत जास्त युझर फ्रेंडली बनवण्यासाठी मेटाकडून बऱ्याच नवीन फीचर्सवर काम केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकांना व्हॉट्सअॅप स्टेटसवर व्हॉईसनोट, व्हॉट्सअॅपच्या युआयमध्ये चेंजेस आणि इंडिव्हिज्युअल चॅटवर लॉक असे काही बदलेले फीचर्स पाहायला मिळू शकतात. लवकरच येणारे व्हॉट्सअॅपचे भन्नाट फीचर युजर्सच्या पसंतीला उतरेल हे नक्की.
मेसेज पाठवल्यानंतर करता येईल एडिट
दरम्यान, व्हॉट्सअॅप वापरताना अनेकदा एखाद्या व्यक्तीला आपण मेसेज पाठवत असताना त्यात टायपिंग एरर होतात. यामुळे अनेकदा चुकीचा मेसेजही समोरच्या व्यक्तीला जातो. तो जाऊ नये म्हणून बरेच लोक तो मेसेज डिलीट करतात. जर तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर या समस्येचा सामना करावा लागला असेल तर लवकरच व्हॉट्सअॅप त्यावर उपाय आणणार आहे. व्हॉट्सअॅप एक खास फीचरवर काम करत आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅप (WhatsApp) एखादा मेसेज चुकीच्या पद्धतीने सेंड झालं असेल, तर तुम्हाला तो डिलीट न करता एडिट करायचं ऑप्शन मिळणार आहे.
Pingback: WhatsApp: फेक कॉल रोखण्यासाठी भारत सरकारने 'हा' महत्त्वाचा निर्णय घेतला - आपला अभ्यास- Aplaabhyas