WhatsApp Update : आपल्यातील बहुतांश जणांकडे मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप इन्स्टॉल केलेलं असतं. यामुळे आपण अनेकांशी कनेक्ट राहण्यास मदत मिळते. व्हॉट्सअॅपकडून युजर्सना जास्तीत जास्त चांगली सुविधा देण्यासाठी कायमच प्रयत्न केले जातात. यात युजर्ससाठी भन्नाट फिचर्सही आणले जातात. पण यावेळी व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी एक नवीन अपडेट आणलं आहे. हे नवीन अपडेट अँड्रॉईड आणि आयओएस युजर्ससाठी आहे. या नवीन अपडेटची व्हॉट्सअॅप (WhatsApp Update) युजर्सही अतुरतेने वाट पाहत असतात. या नवीन अपडेटनुसार, आता एक व्हॉट्सअॅप अकाऊंट एकापेक्षा जास्त मोबाईल डिव्हाईसेसला कनेक्ट करता येणार आहे. याआधी व्हॉट्सअॅप अकाऊंट कम्प्युटर आणि लॅपटॉपसारख्या डिव्हाईसेसवर वापर केलं जातं होतं. पण स्मार्टफोन्सवर वापरता येतं नव्हतं. परंतु, आता व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी एक नवीन भन्नाट फीचर आणलं आहे. या फीचरचा कसा वापर करायचा? हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया…
व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरमुळे कसा फायदा होईल?
याआधी युजर्सना एका मोबाईलमध्ये एकच व्हॉट्सअॅप अकाऊंट वापरता येत होतं. आता नवीन अपडेटनुसार एक व्हॉट्सअॅप अकाऊंट चार मोबाईल डिव्हाईसेसमध्ये वापरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा वापर केल्यामुळे साईन आऊट करण्याची आवश्यकता नाही. तसेच नवीन मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप ओपन केल्यामुळे तुमची व्हॉट्सअॅप चॅटही डिलिट होणार नाही. त्यामुळे युजर्सना हे नवीन फीचर प्रचंड पसंत पडणार आहे. परंतु हे नवीन फिचर छोट्या व्यावसायिकांसाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे. या नवीन फीचरमुळे एकाच WhatsApp Business अकाऊंटवरुन कोणत्याही ग्राहकांशी संवाद साधता येणार आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांना हे फीचर जास्त पसंतीस उतरणार आहे.
एक व्हॉट्सअॅप अकाऊंट अनेक मोबाईलमध्ये कसं वापरायचं?
व्हॉट्सअॅपच्या नवीन फिचरमुळे जास्तीत चार मोबाईल डिव्हाईसेसमध्ये कनेक्ट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी व्हॉट्सअॅप लिंक करण्याची प्रोसेस नेहमीसारखीच असणार आहे. तुम्ही कम्प्युटरच्या डेस्कटॉपवर ज्याप्रमाणे व्हॉट्सअॅप लिंक करता तसंच लिंक करायचं आहे. लिंक करण्याची प्रोसेस खाली दिली असून स्टेप समजून घ्याल.
1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप अकाऊंट ओपन करा.
2. More Options > लिंक्ड डिव्हाईसवर क्लिक करा.
3. यानंतर Link a device वर लिंक करा.
4. तुमचा फोन अनलॉक करा.
5. तुमच्या मोबाईल दुसऱ्या डिव्हाईसच्या स्क्रिनसमोर पकडून क्यूआर कोड स्कॅन करा आणि तुमचं व्हॉट्सअॅप लिंक होईल.
6. यानंतर तुमचं व्हॉट्सअॅप खातं दुसऱ्या मोबाईलमध्ये ओपन होईल.
या सहा स्टेप पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक व्हॉट्सअॅप खातं इतर मोबाईल फोन्समध्ये वापरता करण्याची सुविधा मिळणार आहे.
Pingback: KKR vs GT : गुजरात संघाने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेईंग 11 - आपला अभ्यास
Pingback: IPL 2023 : मिचेल मार्श - साल्ट यांची एकाकी झुंज, दिल्लीचा 9 धावांनी पराभव - आपला अभ्यास- Aplaabhyas
Pingback: Ice Cream Side Effects :कडक उन्हाळा आहे म्हणून आईस्क्रीम खात असाल, तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो - आपला अभ्य
Pingback: WhatsApp: फेक कॉल रोखण्यासाठी भारत सरकारने 'हा' महत्त्वाचा निर्णय घेतला - आपला अभ्यास- Aplaabhyas