मेटाने लाँच केलं नवीन WhatsApp फीचर्स,  मेसेज फॉरवर्ड करताना एडिट करता येणार!

मेटाने लाँच केलं नवीन WhatsApp फीचर्स, मेसेज फॉरवर्ड करताना एडिट करता येणार!

Rate this post

WhatsApp New Features: सध्या व्हॉट्सअॅप मेंसेंजर अॅप युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आज बहुतांश लोकांकडे अॅण्ड्रॉईड स्मार्टफोन्स आहेत आणि या फोनमध्ये नक्कीच व्हॉट्सअॅप इन्स्टॉल केलेलं असणार आहे. तरुणांपासून ते मोठ्यांपर्यंत व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तुमच्यातील अनेकांना दिवसभरात 40-50 वेळा तरी व्हॉट्सअॅपवरील मेसेजेसला चेक करण्याची सवय असणार आहे. आता अशातच व्हॉट्सअॅप युजर्सना आणखीन चांगला अनुभव मिळावा, यासाठी मेटाने दोन नवीन व्हॉट्सअॅप फिचर (WhatsApp New Features) लाँच केली आहेत. यामध्ये तुम्ही सर्वप्रथम  ‘Polls’ च्या प्रतिसादाला मर्यादित करू शकणार आहात आणि दुसरं म्हणजे व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेज किंवा कॅप्शन एडिट करू शकणार आहात. त्यामुळे व्हॉट्सअॅप युजर्सना हे भन्नाट फिचर प्रचंड पसंतीस उतरणार आहे.

Also Read  Bageshwar dham: होटल मे धीरेंद्र शास्त्री के ठहरने के लिए कितना पैसा वसूला? आप अपने रसोईया के हाथ से बना हुआ खाना खाएंगे।

‘या’ फिचरचा असा  वापर करता येणार?

आतापर्यंत तुम्ही एखाद्या पोलिंगशी संबंधित प्रश्न उपस्थित केल्यानंतर व्हॉट्सअॅप युजर्स एकापेक्षा जास्तवेळा प्रतिसाद देता येऊ शकत होते. यामुळे अचूक पोलिंग रिझल्ट उपलब्ध होत नव्हता. पण आता नवीन व्हॉट्सअॅप अपडेट आल्यामुळे युजर्सना एक भन्नाट ऑप्शन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे ऑप्शन ‘मल्टीपल रिस्पाँस’च्या नावानं उपलब्ध असणार आहे. या ऑप्शनची निवड केल्यानंतर टर्न ऑफ करून फक्त एकदाच प्रतिसाद देता येणार आहे. त्यामुळे युजर्सना हा नवीन ऑप्शपनही खूप पसंत पडणार आहे.

तसेच यामध्ये दुसरं फिचर तर प्रचंड भन्नाट आहे. यामध्ये तुम्ही तुमचे फोटोज, व्हिडिओज किंवा डॉक्युमेंट व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड करतेवेळी त्याचं कॅप्शन एडिट करू शकणार आहात. यापूर्वी अशा प्रकारचं ऑप्शन उपलब्ध नव्हते. यासाठी युजर्सना मॅन्युअली फाईलची निवड करूनच पुढील प्रोसेस पूर्ण करावी लागत होती. परंतु, आता मेसेज फॉरवर्ड करण्याच्या दरम्यान युजर्सना कॅप्शन एडिट करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे समोरील व्यक्तीला पाठवलेला मेसेज चांगलं वाचता आणि समजता येणार आहे. या फिचरमधील हा दुसऱ्या पर्याय अनेक युजर्संना मोठ्या प्रमाणात आवडणार आहे. यामध्ये फोटोज, व्हिडिओज आणि डॉक्युमेंट्सशी संबंधित एडिटचं ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे तरूणाईला प्रचंड आवडणार आहे. हे दोन्ही फिचर्स युजर्सना प्ले स्टोरवर उपलब्ध व्हॉट्सअॅपच्या नवीन व्हर्जनमध्ये आहेत. तुम्हाला जर ही नवीन अपडेट मिळाली नसेल, तर मोबाईलमधील प्ले स्टोरवर जाऊन अॅप अपडेट करून घ्या.

Also Read  आता चुकीला 'माफी'! व्हॉट्सअॅपवर मेसेज एडिट करता येणार, जाणून घ्या कसं काम करणार फिचर

लवकरच युजर्सना ‘हे’ नवीन फिचर उपलब्ध होणार

सद्या व्हॉट्सअॅप दुसऱ्या एका भन्नाट फिचरवर काम करत आहे. या फिचरच्या लाँचिंगनंतर युजर्सची प्रायव्हसी आणखीन सुरक्षित होईल. तसेच मेटाकडून ‘चॅट लॉक’या नावाच्या फिचरवर काम केलं जात आहे.  या फिचरमुळे युजर्सला त्यांच्या व्हॉट्सअॅपमधील कोणत्याही इंडिव्हिज्युअल चॅटला लॉक करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी युजर्सना त्यांचे फिंगरप्रिंट आणि पासवर्डचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या या नवीन फिचरची लॉजिंगआधीच युजर्सच्या मनात उत्सुकता लागली आहे. प्रायव्हसीशी संबंधित फिचर असल्यामुळे युजर्ससाठी हे अत्यंत महत्वाचं फिचर असणार आहे.

Also Read  WhatsApp आणणार भन्नाट फीचर, कंटेट क्रिएटर्ससाठी फायदेशीर ठरणार; जाणून घ्या कसं असेल नवीन फीचर?

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

 

1 thought on “मेटाने लाँच केलं नवीन WhatsApp फीचर्स, मेसेज फॉरवर्ड करताना एडिट करता येणार!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?