Wakeup With Headache:सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवतोय? मग दुर्लक्ष नको, जाणून घ्या का ते?

Wakeup With Headache:सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवतोय? मग दुर्लक्ष नको, जाणून घ्या का ते?

Rate this post

Wakeup With Headache: सध्या बदल्या लाईफस्टाईलमुळे प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येतं आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात डोकंदुखीने (Wakeup With Headache) होत असेल,  सकाळी झोपेतून उठल्याबरोबर डोकं एकदम जड पडल्यासारखं जाणवत असेल आणि पोटात मळमळल्यासारखं होत असेल, तर याकडे दुर्लक्ष करणे महाग पडू शकतं. ही आरोग्याविषयक समस्या गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया…

तुमचं दररोज सकाळी डोक दुखतं का?

ज्या लोकांना मानेशी संबंधित समस्या आहे अशा लोकांची सकाळ डोकंदुखीसोबत होते. यामागे अनेक कारणे असू शकतात. रात्री झोपताना सुयोग्य स्थितीत न झोपता कसंही झोपणे, झोपताना मानेच्या स्नायूंवर दाब पडणे अशी कारणे असू शकतात. मानदुखीमुळे होणारी समस्या अत्यंत गंभीर असते. यामध्ये  तुमच्या मानेचे स्नायू खूप घट्ट असल्यामुळे डोके दुखीची समस्या होऊ शकते. यालाच सर्विकोजेनिक डोकेदुखी (Cervicogenic Headache) असंही म्हणतात. यामध्ये निद्रानाशाचाही त्रास होऊ शकतो.  मान, पाठ, कंबरेचा भागही दुखतो. त्यामुळे सकाळी डोके दुखी होत असेल, तर दुर्लक्ष करू नका. याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यामध्ये मान आकडणे आणि मानेची हालचाल बंद होणे इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात.

Also Read  आइकू मोबाईलच्या ऑनलाईन विक्रीत 300 टक्क्यांची वाढ, राज्यातील सर्वाधिक वेगाने वाढणारा ब्रँड

नेहमी होणारी डोकेदुखी

1. तुम्हाला मान आणि डोकेदुखीशी संबंधित कोणतीही समस्या असेल, तर घरगुती उपाय करणे टाळा. यासाठी लवकरात लवकर चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्याल.
2. दररोज सकाळी होणारी डोकेदुखी
3. रात्री झोपण्याआधी होणारी डोकेदुखी
4. अचानक सुरू होणारी डोकेदुखी आणि काही मिनिटानंतर आपोआप बंद होणारी डोकेदुखी
5. डोक किंवा चेहेरा यांच्या कोणत्याही एका बाजूच्या भागात होणारा त्रास

Also Read  कोकणात किनाऱ्यावर क्रिकेट खेळत आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घेत सचिनने साजरा केला वाढदिवस

डोकेदुखीचं मुख्य कारण

दररोज कोणत्याही एक वेळी होणाऱ्या डोकेदुखीमागे वेगवेगळी कारणे असू शकतात. पण मानसिक तणाव हे सर्वसामान्य कारण समजलं जातं.  दुर्देवाने आपल्याकडे अजून तणावाला समस्या म्हणून पाहिलं जातं नाही. परंतु, वयोवृ्द्ध लोकांना भेडसावणारा ‘तणाव’ हा जवळपास प्रत्येक मानसिक समस्येतील पहिलं कारण असतं. त्यामुळे स्वत: ला तणावापासून दूर ठेवा. त्यासाठी मोकळ्या वातावरणात व्यायाम करा, पायी चालायची सवय लावा आणि मेडिटेशन किंवा विपश्यना करा. हे अत्यंत गांभीर्याने करायल हवं.

Also Read  Drinking Water Benefits:पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का? अनेक आजारांपासून राहाल दूर

(Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ वाचकांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.)

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

 

2 thoughts on “Wakeup With Headache:सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवतोय? मग दुर्लक्ष नको, जाणून घ्या का ते?”

  1. Pingback: IPL 2023 Points Table :विजयासह मुंबई आणि पंजाबची गुणतालिकेत उडी; पाहा तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर? - आपला

  2. Pingback: Satwiksairaj Rankireddy and Chirag Shetty :सात्विक-चिरागची ऐतिहासिक कामगिरी, बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये 58 वर्षांनंत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?