अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, गुंतवणुकीबाबत म्हणाले…

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, गुंतवणुकीबाबत म्हणाले…

Rate this post

Tim Cook Meets PM Modi:  भारत दौऱ्यावर असणारे अॅपलचे सीईओ टिम कुक (Tim Cook) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. आपल्या भारत दौऱ्यात स्वागताने भारावून गेलेल्या टिम कुक यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. टीम कूक यांनी भारतात अॅपलचा विस्तार करणार असून गुंतवणुकीवरही भर देणार असल्याचे म्हटले.

टिम कुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबतची माहिती ट्वीट करून दिली. टिम कुक यांनी म्हटले की, शिक्षण, तंत्रज्ञान, उत्पादन आणि पर्यावरण आदी मुद्यांवर पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकारात्मक दृष्टीकोणातून चर्चा झाली. देशभरात व्यवसाय विस्तारासह गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Reels

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील टिम कुक यांच्यासोबत झालेल्या बैठकीची माहिती ट्वीटरवरून दिली. टिम कुक यांच्यासोबत भेटून विविध मुद्यांवर चर्चा झाली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतात होत असलेल्या तंत्रज्ञान बदलाबाबत चर्चा करून  आनंद वाटला असल्याचे त्यांनी सांगितले.

Also Read  Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana:फक्त 436 रुपयात दोन लाखांचा विमा; केंद्र सरकारची ही भन्नाट पॉलिसी

टिम कुक हे सोमवारपासून भारत दौऱ्यावर आले आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी मुंबईचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अॅपलचे पहिल्या स्टोअरचे उद्घाटन केले. त्याशिवाय, उद्योग, बॉलिवूड, क्रीडा क्षेत्राशी संबंधित दिग्गजांची भेट घेतली. आज, बुधवारी टिम कुक हे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी आज पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. टिम कुक हे गुरुवारी साकेत सिटी वॉल मॉलमध्ये अॅप्पलच्या दुसऱ्या स्टोअरचे उद्घाटन केले.

Also Read  तुम्हाला मुंबईतील अॅपल स्टोअरच्या 5 युनिक गोष्टी माहिती आहेत काय?

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?