Team of the Week: ऋतुराजची सलामी अन् मार्क वूडचा भेदक मारा, या आठवड्यात 11 खेळाडूंनी मारली बाजी

Team of the Week: ऋतुराजची सलामी अन् मार्क वूडचा भेदक मारा, या आठवड्यात 11 खेळाडूंनी मारली बाजी

Rate this post

IPL  2023 Team of the Week : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होऊन आठवडा झाला आहे. 31 मार्च रोजी गतविजेत्या गुजरात आणि चेन्नई यांच्यातील लढतीने आयपीएलचा रन संग्राम सुरु झाला होता. आठवडाभरात आयपीएलचे नऊ सामने झाले आहेत. यामध्ये फलंदाज आणि गोलंदाजांनी आपापली कामगिरी चोख बजावली आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा इम्पॅक्टही दिसून आला. काही सामने एकतर्फी झाले तर काही सामने श्वास रोखायला लावणारे होते. पंजाब आणि राजस्थान यांच्यातील सामन्याने आयपीएलचा रोमांच आणखी वाढला. तर गुरुवारी कोलकात्याने आरसीबीचा विराट पराभव केला. नऊ सामन्यात काही दिग्गज फ्लॉप झाले तर काही युवा खेळाडूंनी आपली चुणूक दाखवून दिली. स्पर्धा जसजशी पुढे जाऊ लागली तसतशी लोकांमध्ये याची रुची वाढत असल्याचे दिसत आहे. या आठवडाभरात आयपीएलमध्ये अनेक विक्रम झाले… दर आठवड्याला चांगली कामगिरी करणाऱ्या टॉप खेळाडूंचे प्लेईंग 11 आपण निवडणार आहोत. त्याशिवाय आठवड्याचा इम्पॅक्ट प्लेअर कोण… याबद्दलही सांगणार आहोत…

सलामीला कोण ?

चेन्नईचा ऋतुराज गायकवाड आणि लखनौचा काइल मायर्स या दोन्ही सलामीवीरांनी आपापल्या संघासाठी धावांचा पाऊस पाडलाय. ऋतुराज गायकवाडने दोन सामन्यात 149 धावा फटकावल्या आहेत तर काइल मायर्स याने दोन सामन्यात 126 धावा चोपल्या आहेत. या दोघांनीही दोन्ही सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. ऋतुराजने 13 षटकार लगावले आहेत. तर काइल मायर्स याने 9 षटकार मारलेत. पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडण्यात हे दोन्ही फलंदाज सक्षम आहेत. सलामीसाठी या दोघांशिवाय शिखर धवन, विराट कोहली यांची नावेही होती… पण काइल मायर्स आणि ऋतुराज गायकवाड यांची आकडेवारी इतरांपेक्षा सरस आहे. काइल मायर्स गोलंदाजीमध्येही जास्त योगदान देऊ शकतो. त्यामुळे या आठवड्याच्या प्लेईंग ११ चे सलामीवीर आहेत मराठमोळा ऋतुराज आणि रांगडा वेस्ट इंडियन कायल मायर्स.

Also Read  CHIST Core i5 Desktop Complete Computer System Full Setup for Home & Business(core I5 3470 Processor/19 Monitor/Keyboard Mouse/Windows 11/ WiFi) (16GB RAM/512GB SSD)

मधल्या फळीचा भार कुणावर ?

मोईन अली, तिलक वर्मा आणि संजू सॅमसन मध्यक्रम मजबूत करु शकतात. या खेळाडूंचा फलंदाजी क्रम परिस्थितीनुसार बदलला जाऊ शकतो. मोईन अली याने चेन्नईच्या दोन्ही सामन्यात अष्टपैलू योगदान दिलेय. त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार कामगिरी केली आहे. एका सामन्यात मोईन अलीने 4 विकेट घेतल्या आहेत. तर फलंदाजीत 42 धावांचे योगदान दिलेय. तिलक वर्माने पहिल्याच सामन्यात मुंबईचा डाव सावरला होता. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन यासारखे फलंदाज बाद झाल्यानंतरही तिलक वर्मा याने एकहाती किल्ला लढवला होता. आरसीबीविरोधात तिलक वर्माने नाबाद 84 धावांची खेळी केली होती. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने आपल्या फलंदाजीने प्रभावित केलेय. त्याने दोन सामन्यात 97 धावांचे योगदान दिलेय. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. संजू सॅमसनकडे विकेटकिपरची जबाबदारीही असेल.

Also Read  IPL 2023 KKR vs SRH : कोलकात्यासाठी रिंकू पुन्हा आला धावून, अखेरच्या चेंडूवर मारला चौकार

कर्णधार कोण ? 

दहा संघाच्या कर्णधारामधून एकाची निवड करणे कठीण होते.. पण संघाच्या कर्णधारापेक्षा हार्दिक पांड्याचे नेतृत्व चांगले होते.  पण हार्दिक पांड्याची वैयक्तिक कामगिरी साधारण राहिली आहे.  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने दोन्ही सामन्यात विजय मिळवलाय. गुजरातचा संघ गुणतालिकेत टॉपवर आहे. हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्येही आपले योगदान देऊ शकतो. आतापर्यंत हार्दिक पांड्याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करु शकला नाही. पण इतर कर्णधारांच्या तुलनेत हार्दिकने प्रभावी नेतृत्व केलेय. गोलंदाजीतील बदल असोत अथवा फिल्डिंगमधील योग्यवेळी केलेला बदल.. हार्दिक पांड्या सरस राहिलाय. त्यामुळे या आठवड्याचा टॉप कप्तान असेल हार्दिक.

फिरकीची धुरा कुणाच्या खांद्यावर ? – 

राशिद खान आणि वरुण चक्रवर्ती फिरकीची धुरा सांभाळतील. त्यांच्या जोडीला मोईन अली असेल. राशिद खान याने दोन सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. वेळप्रसंगी राशिद खान कमी चेंडूत मोठे फटकेसुद्धा लगावू शकतो. वरुण चक्रवर्तीने आरसीबीविरोधात प्रभावी मारा केला. वरुण चक्रवर्ती याने दोन सामन्यात पाच विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय त्यांने धावाही रोखल्या आहेत.

Also Read  happy gudipadwa: गुढीपाडवा सण साजरी करण्याची पद्धत

अष्टपैलू कोण कोण ?-
शार्दूल ठाकूर अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडेल. शार्दूल याने आरसीबीविरोधात वादळी अर्धशतक झळकावले. 5 बाद 89 अशा बिकट अवस्थेतून  शार्दूलच्या फटकेबाजीमुळे कोलकाता संघ 200 पार गेला. शार्दूल ठाकूर तळाला फलंदाजी करण्यास सक्षम आहे. त्याशिवाय गोलंदाजीही करु शकतो. शार्दूलने दोन सामन्यात एक विकेट घेतली आहे. हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, मोईन अली, काइल मायर्स हे अष्टपैलू खेळाडू असतील.

वेगवान गोलंदाजीची धुरा कुणाकडे ?
मोहम्मद शामी आणि मार्क वूड वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. पहिल्या आठवड्यात या दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. मार्क वूड याने दोन सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. तर शामीने दोन सामन्यात पाच जणांना तंबूत पाठवलेय. यांच्या जोडीला हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर आणि काइल मायर्स असतील.

या आठवड्याची प्लेईंग 11 Team of the Week

ऋतुराज गायकवाड  (चेन्नई)
काइल मायर्स (लखनौ)
मोईन अली (चेन्नई)
तिलक वर्मा (मुंबई)
संजू सॅमसन (राजस्थान) (विकेटकिपर)
हार्दिक पांड्या (गुजरात) (कर्णधार)
शार्दूल ठाकूर (कोलकाता)
राशिद खान (गुजरात)
मार्क वूड (लखनौ)
मोहम्मद शामी (गुजरात)
वरुण चक्रवर्ती (कोलकाता)

इम्पॅक्ट कोण पाडणार – 
साई सुदर्शन, सुयश शर्मा, तुषार देशपांडे, ध्रुव जुरेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?