नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगमध्ये आजच्या पोस्टमध्ये आपण बघणार आहोत, teacher transfer portal वरून गेल्या एक वर्षभरापासून चालू असलेल्या बदली प्रक्रियेमध्ये अंतिम टप्पा म्हणजे आपले बदली आदेश आपल्या लॉगिनला येऊन धडकलेले आहेत. ते बदली आदेश आपण पीडीएफ स्वरूपात कसे डाउनलोड करायचे याविषयी सविस्तर माहिती या पोस्टमध्ये दिलेली आहे स्टेप बाय स्टेप आपण ती समजून घेऊन आपले बदले आदेश डाऊनलोड करू शकता.
teacher transfer portal बदली आदेश डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला टीचर ट्रान्सफर पोर्टलवर जायचे आहे त्यासाठी मी इथे लिंक देत आहे. पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
teacher transfer portal वरील लिंक वर आपण क्लिक केल्यानंतर लॉगिन पेज ओपन होईल ते लॉगिन पेज आपल्याला खालील प्रमाणे दिसणार आहे.
teacher transfer portal वरील प्रमाणे लॉगिन पेज दिसल्यानंतर सर्वप्रथम आपण पोर्टलला दिलेला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर खाली सेंड ओटीपी असे ऑप्शन आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सेंड ओटीपी म्हटल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक मेसेज जाईल त्यावरती ओटीपी येईल तो ओटीपी आपण खाली टाकायचे आहे. ओटीपी टाकल्यानंतर खाली कॅपिटल अक्षर आणि अंक याच्यामध्ये कॅपच्या दिलेला आहे तो कॅप्चा टाकायचा आणि खाली लॉगिन बटणावर क्लिक करायचं आहे ही प्रोसेस केल्यानंतर आपण लॉगिन झालेलो आहे लॉगिन झाल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे विंडो दिसणार आहे त्याची माहिती आपण सविस्तर खाली बघू.
teacher transfer portal लॉगिन केल्यानंतर आपल्याला वरील प्रमाणे विंडो दिसत आहे त्यामध्ये आपण सर्वप्रथम उजव्या बाजूला वरती भाषा आहे तिथे मराठी वर क्लिक करा म्हणजे आपल्याला मराठीमध्ये सर्व वाचायला मिळेल. मराठी वरती क्लिक केल्यानंतर बघा सर्व ऑप्शन आपल्याला मराठीमध्ये दिसत आहेत. त्यामध्ये आपण जिल्हाअंतर्गत बदली या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे जिल्हांतर्गत बदली ऑप्शन वरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बदली यादी त्याच्यानंतर अर्ज आणि सर्वात खालती आहे बदली आदेश त्या बदली आदेश या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. बदली आदेश ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खालील प्रमाणे विंडो दिसणार आहे आणि त्यामध्येच आपल्याला दिसणार आहे की आपला बदले आहेत कुठून डाऊनलोड करायचा आहे.
teacher transfer portal वरील विंडोमध्ये दाखविल्याप्रमाणे उजव्या बाजूला वरती डाऊनलोड असं ऑप्शन मराठी मध्ये आपल्याला दिसेल त्यावरती फक्त माऊस नेऊन क्लिक करा आपल्या बदली आदेश डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये डाऊनलोड झालेला आपल्याला दिसेल. डाउनलोड झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण माऊस नेऊन क्लिक करून शोईन फोल्डर असे करून आपण कोणत्या फोल्डरमध्ये तो आदेश आहे ते बघू शकतो आणि त्याला ओपन करू शकतो. ते आपल्याला खालील प्रमाणे विंडोमध्ये दाखवलेले आहे.
अशाप्रकारे मित्रांनो आज आपण आपली बदली आदेश कसे डाऊनलोड करायचे यावेळेस ती सविस्तर असे सखोल माहिती प्राप्त केलेली आहे या माहितीचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल अशी आशा व्यक्त करतो आणि आजचा लेख संपवतो. अशाच प्रकारचे लेख तंत्रज्ञानावर आधारित टिप्स अँड ट्रिक्स आपल्याला मिळणार आहेत तरी या ब्लॉगला सबस्क्राईब करा आपण साईट ओपन केल्याबरोबर आपल्याला सबस्क्राईब नावाचा एक मेसेज येत असेल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा म्हणजे आलेल्या नवनवीन पोस्ट आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील. धन्यवाद
आपल्या हि पोस्ट कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा