TC student transfer certificate:शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

3/5 - (3 votes)


शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवहीचा (जनरल रजिस्टर) नमुना सुधारित करणेबाबत.

TC student transfer certificate
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्र. संकीर्ण-२३१६/(२२९/१६)/एस.डी.४
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई ४०००३२.
दिनांक : १९ सप्टेंबर, २०१६
१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ .
२. माध्यमिक शाळा संहिता.
३. शासन निर्णय क्र. पी आर ई/२०१०/(२१५) प्राशि-१, दिनांक ११ जून, २०१०
४. महाराष्ट्र शासन राजपत्र – महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ दिनांक ११ ऑक्टोबर, २०११.
प्रस्तावना :
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक प्रमाणभूत व महत्वाचा दस्तऐवज आहे. विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेणे, जातीचा दाखला व पारपत्र मिळविणे व इतर अनेक बाबींसाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे प्रमाणपत्र म्हणजे विद्यार्थ्यांची व शाळेची परिपूर्ण ओळखच असते. सध्या माध्यमिक शाळा संहिता नियम १७ व परिशिष्ट ४ मध्ये शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राचा नमुना दिलेला आहे. तसेच परिशिष्ट १८ मध्ये सर्वसाधारण नोंदवहीचा नमुना (जनरल रजिस्टर) दिलेला आहे. असे असले तरी शाळा शाळांमधून शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात एकवाक्यता नाही त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शिक्षक संघटना, पालक आणि विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि सर्वसाधारण नोंदवही (जनरल रजिस्टर) मधील नोंदीत राज्यभर एकवाक्यता असणेबाबत वारंवार मागणी करण्यात येत होती. तसेच सरल प्रणालीमार्फत शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र निर्गमित करणेसाठी काही बदल करणे आवश्यक होते.
शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात व त्या अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवहीमध्ये कोणत्या नोंदी आवश्यक आहे याबाबत पालकांकडून व शाळा मुख्याध्यापकांकडून सूचना मागविण्यात आलेल्या होत्या. या सूचनांच्या आधारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या, सर्व मंडळांचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांसाठी शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रात व सर्वसाधारण नोंदीत राज्यभर एकसारखेपणा आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Also Read  mis:samagra shiksha, केंद्रप्रमुखांना समग्र शिक्षा अंतर्गत टॅबलेट मिळणार 

शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२३१६/(२२९/१६)/एस.डी.४
शासन निर्णय :
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील बालकांच्या प्रवेशाबाबतच्या तरतूदी, सरलप्रणाली मध्ये घ्यावयाच्या आवश्यक नोंदी तसेच पालक व शाळांचे मुख्याध्यापकांकडून प्राप्त झालेल्या सूचनांचा साकल्याने विचार करुन, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व त्या अनुषंगाने सर्वसाधारण नोंदवही (जनरल रजिस्टर) यातील नोंदीबाबत राज्यभर एकसारखेपणा आणण्यासाठी सोबत जोडलेल्या सुधारित नमुन्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. हा शासन निर्णय २०१६-१७ या वर्षापासून लागू राहील. सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना हा निर्णय लागू राहील. सर्व शाळा प्रमुखांनी आपापल्या शाळांमध्ये रजिस्टर व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यांची छपाई नवीन नमुन्याप्रमाणे करुन घ्यावी.
सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१६०९१९१७२७१३६२२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
प्रत :
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,
Suvarna S Kharat

(डॉ. सुवर्णा सि. खरात)
उपसचिव, महाराष्ट्र शासन
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई २. शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे
३. मा. मुख्यमंत्री यांचे उपसचिव, मा.मुख्यमंत्र्यांचे सचिवालय, मंत्रालय, मुंबई ४. मा. मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ, पुणे
६. अध्यक्ष, CBSE, नवी दिल्ली
७. अध्यक्ष, ICSE, नवी दिल्ली
८. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
९. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
१०.विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ (सर्व)
११.राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिपद, मुंबई
१२.सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
१३.प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
१४.शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) जिल्हा परिपद (सर्व)
१५.सर्व गटशिक्षणाधिकारी
१६.
.सर्व शाळांचे मुख्याध्यापक (गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत) १७.निवडनस्ती एसडी-४
पृष्ठ २ पैकी २

Also Read  Ashram shala :आश्रम शाळा भोजन व्यवस्थापन आजचा नवीन शासन निर्णय
शाळा-सोडल्याचा-दाखला-व-जनरल-रजिष्टर-सुधार

25 thoughts on “TC student transfer certificate:शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र”

  1. Pingback: cluster head exam schedule 2023: केंद्रप्रमुख विभागीय परीक्षा नियोजन - आपला अभ्यास- Aplaabhyas

  2. Pingback: How to apply Cluster Head: (KENDRAPRAMUKH) exam केंद्रप्रमुख परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा - आपला अभ्यास- Aplaabhyas

  3. Pingback: महागाई भत्त्याच्या दरात दिनांक १ जानेवारी २०२३ पासून 42% वाढ - आपला अभ्यास- Aplaabhyas

  4. We are a bunch of volunteers and starting a
    brand new scheme in our community. Your site
    provided us with useful info to work on. You’ve performed a formidable process and our entire neighborhood will probably be grateful to you.

  5. Hi, i think that i saw you visited my site so i came to return the prefer?.I’m trying to in finding issues to improve my
    web site!I assume its good enough to make use of some of your concepts!!

  6. I do believe all of the ideas you’ve introduced in your post.
    They are really convincing and will certainly work. Still, the
    posts are very quick for beginners. May you
    please lengthen them a little from subsequent time?

    Thanks for the post.

  7. Please let me know if you’re looking for a article
    author for your weblog. You have some really great articles and I feel I would be a good asset.
    If you ever want to take some of the load
    off, I’d absolutely love to write some articles for your blog in exchange for a link back to mine.
    Please shoot me an email if interested. Kudos!

  8. Hey I know this is off topic but I was wondering if you knew of any
    widgets I could add to my blog that automatically tweet my newest twitter updates.
    I’ve been looking for a plug-in like this for quite some time and was hoping maybe you would
    have some experience with something like this.
    Please let me know if you run into anything.
    I truly enjoy reading your blog and I look forward to your
    new updates.

  9. Wow that was strange. I just wrote an incredibly long comment but after
    I clicked submit my comment didn’t appear. Grrrr… well I’m not writing all that over again. Anyway,
    just wanted to say great blog!

  10. I have been surfing on-line greater than 3 hours these days, but I
    by no means discovered any fascinating article like yours.
    It is lovely worth enough for me. In my opinion, if all webmasters and bloggers made
    good content as you did, the internet can be a lot
    more helpful than ever before.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?