शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स 763, तर निफ्टी 195 अंकांनी घसरला

शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स 763, तर निफ्टी 195 अंकांनी घसरला

Rate this post

Stock Market Opening Bell Today: आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस. आज शेअर बाजारात (Stock Market) मोठ्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली. या दरम्यान सेन्सेक्स (Sensex) 600 अंकांनी खाली आला आहे. तर निफ्टीतही (Nifty) घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार बंद असून त्यादिवशी कोणतेही व्यवहार शेअर बाजारात झाले नव्हते. तर त्यापूर्वी गुरुवारी सेन्सेक्स 38 अकांच्या किंचित उसळीसह 60,431 वर बंद झाला होता.

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. इन्फोसिसच्या कमकुवत निकालांमुळे स्टॉक 10 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे बाजारावर दबाव आला. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये मोठी घसरण होत आहे. SGX निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली असून इंडेक्स 17800 च्या खाली व्यवहार करत आहे. आशियाई बाजारांमध्ये निक्केई आणि कोस्पी देखील लाल चिन्हानं व्यवहार करत आहेत. त्याचप्रमाणे DOW, Nasdaq आणि S&P देखील यूएस फ्युचर्स मार्केटमध्ये व्यवहार करत आहेत.

Also Read  युजर्सच्या 'दिलदारपणा'चा नेटफ्लिक्सला फटका; ग्राहकांचं होणार असं नुकसान, काय झालं नेमकं?

इन्फोसिसचा शेअर का पडला?

आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीतील इन्फोसिसच्या तिमाही निकालांमुळे बाजारात पडझड झाली आहे. तसेच, कंपनीनं नवीन आर्थिक वर्षासाठी गायडेंस देखील कमी केलं आहे. त्यामुळे इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. इन्फोसिसचा शेअर 10 टक्क्यांनी घसरून 1,250 रुपयांवर उघडला. हा शेअर सध्या 12 टक्क्यांनी घसरून 1222 वर व्यवहार करत आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात शेअर 1389 रुपयांवर बंद झाला होता. इन्फोसिसच्या खराब निकालानंतर अनेक ब्रोकरेज हाऊसेसनं इन्फोसिसच्या शेअरचं मूल्य कमी करून गुंतवणूकदारांना शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. इन्फोसिसच्या एडीआरमध्ये मोठी घसरण झाली, त्यानंतर बाजार उघडल्यानंतर तीन दिवसांनी इन्फोसिसच्या शेअरमध्ये घसरण झाली.

Also Read  Share Market Opening on 4 May:सेन्सेक्स-निफ्टीची स्थिर सुरुवात; आयटी शेअर्समध्ये घसरण सुरूच

दुसरे आयटी स्टॉक्सही घसरले

इन्फोसिसमधील घसरणीमुळे, LTI Mindtree 8.76 टक्क्यांनी, Tech Mahindra 6.46 टक्के, L&T Technology 5.86 टक्के, Coforge 4.88 टक्के, तर TCS 3.42 टक्क्यांनी घसरले आहेत. पर्सिस्टंट 7.75 टक्क्यांनी, केपीआयटी टेक 4.49 टक्क्यांनी घसरले आहेत. एचसीएल टेक 4.59 टक्क्यांनी, विप्रो 2.50 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. आयटी इंडेक्स आणि शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. सध्या सेन्सेक्स 900 पेक्षा जास्त तर निफ्टी 230 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

Also Read  Eye Disease: तुमच्या मुलांच्या हातात सतत मोबाईल असतो? मग वेळीच सावध व्हा, अन्यथा होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

शुक्रवारी शेअर मार्केटमधील व्यवहार होते बंद 

शुक्रवारी 14 एप्रिल रोजी शेअर मार्केटमधील व्यवहार बंद होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शेअर बाजाराला सुट्टी होती. त्यामुळे त्यादिवशी गुंतवणूकदार BSE आणि NSE वर (BSE and NSE) व्यवहार करू शकले नाहीत. शेअर बाजाराच्या एप्रिल 2023 च्या हॉलिडेच लिस्टनुसार आणि BSE वेबसाईट bseindia.com वर अपडेट केलेल्या माहितीनुसार, भारतीय शेअर बाजारात (Stock Market Closed) 14 एप्रिल रोजी कोणतीही ट्रेडिंग अ‍ॅक्टिव्हिटी होणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?