इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षा मराठी 13.संवाद व त्यावर आधारित प्रश्न उत्तरे
.भविष्य सांगणार… भविष्य सांगणार…” “आई, आई तो माणूस बघ काय म्हणतोय!’ “अगं, तो लोकांचा हात पाहून पुढे काय होणार ते सांगतो.” “मग माझापण हात दाखव की त्यांना, बघू मला काय सांगतात ते. “अगं चिमे, ते सगळं खोटं असतं! मला माहिती आहे.” “तू गप्प बस दादा, मोठा शहाणा झालास!” “ये अंधश्रद्धाळू, जरा विज्ञान शीक, विज्ञान शीक.” “पण ते काय सांगताहेत ते तरी बघू!” ‘काय ते सांगणार? मी सांगू का तुला?” “सांग, सांग. ” ” “तुझ्या हातावरून असं नक्की कळतंय उदया तुझं लग्न ठरणार!!’ “बघ ना गं आई, दादा मला चिडवतोय.” “अगं वेडे, स्वत:चे नशीब स्वतःच्या कर्मावर अवलंबून असते.’ “बरं बाबा.”