Samsung Galaxy S24 Series: मोबाईल कंपन्यांतील लोकप्रिय कंपनी सॅमसंगची नवीन सिरीज लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सॅमसंग ही कोरियन कंपनी असून फेब्रुवारीमध्ये Samsung Galaxy S23 सिरीज लॉंच केली होती. याच सिरीजचे दोन महिन्यापूर्वी तीन स्मार्टफोन बाजारात लॉंच केले होते. या सिरीजनंतर आता सॅमसंगची पुढीस सिरीजचा अर्थात, सॅमसंग गॅलेक्सी S24(samsung galaxy S24 Series) लॉन्च करणार आहे. या संदर्भातील माहिती इंटरनेटवर लिक झाली आहे. या स्मार्टफोनमध्येच्या रॅम आणि प्रोसेसरमध्ये बदल करण्यात आले, ही माहिती लिक झालेल्या माहितीतून समोर येत आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
सॅमसंग गॅलेक्सी S24 सिरीजमधील बदल
सॅमसंग गॅलेक्सीच्या या नवीन सिरीजमध्ये युजर्सला काही बदल पाहायल मिळू शकतात. तरूण वत्स नावाच्या टिपस्टरने ट्विटरच्या माध्यमातून सॅमसंग गॅलेक्सी S24 सीरीजबद्दल काही माहिती शेअर केली आहे. या मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी S24, सॅमसंग गॅलेक्सी S24 plus आणि सॅमसंग गॅलेक्सी S24 ultra अशा तीन रूपात पाहायला मिळू शकतो.
GALAXY S24 Series :: Ram/Storage
S24/S24+ :: Ram will be upgraded from 8 GB memory to 12 GB, base models with 256GB Storage capacity..
Galaxy S24 Ultra :: Ram could reach upto 16 GB..#GalaxyS24#samsunggalaxy pic.twitter.com/PIIA9qRjEF
— Tarun Vats (@tarunvats33) April 2, 2023
सॅमसंग गॅलेक्सी S24 आणि S24 प्लसमध्ये 12GB रॅम मिळू शकतो. पण आतापर्यंत फक्त सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा मॉडेलमध्ये 12GB रॅम सपोर्ट पाहायला मिळाला आहे. याशिवाय गॅलेक्सी अल्ट्रा मॉडेलमध्ये 16GB रॅम उपलब्ध असण्याची शक्यता आहे. यासोबत गॅलेक्सी S24 व गॅलेक्सी S24 प्लस या स्मार्टफोनमध्ये 256GB इतका इंटरनल स्टोरेजचा ऑप्शन उपलब्ध झालेला पाहायला मिळू शकतो. तर गॅलेक्सी S24 या स्मार्टफोनमध्ये इन-हाऊस मेड Exynos 2400 चिपसेट मिळू शकतो. या फोनमध्ये 144hz ला सपोर्ट करणारा डिस्प्ले पाहायल मिळण्याची शक्यता आहे. असे लिक झालेल्या माहितीद्वारे समोर आले आहे. पण या नवीन स्मार्टफोन सिरीजबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.