कोकणात किनाऱ्यावर क्रिकेट खेळत आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घेत सचिनने साजरा केला वाढदिवस

कोकणात किनाऱ्यावर क्रिकेट खेळत आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घेत सचिनने साजरा केला वाढदिवस

Rate this post

Sachin Tendulkar Birthday Celebration  : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने काल वयाचं अर्धशतक पूर्ण केलं. सचिनने आपला वाढदिवस भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या  हॉटेलमध्ये साजरा केला. आश्चर्याची बाब म्हणजे सचिनने कोणत्याही आलिशान जागेवर किंवा डेस्टीनेशनवर वाढदिवस साजरा न करता साधेपणाने कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यावर साजरा केला.  क्रिकेटचा देव त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने थेट देवभूमी कोकणात पोहोचला.

Sachin Tendulkar Birthday Celebration : कोणत्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होता सचिन?

  • आपल्या 50 व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकर सिंधुदुर्गात दाखल झाला. सचिनने आपला वाढदिवस भोगवे समुद्रकिनारी असलेल्या साध्या हॉटेलमध्ये साजरा केला. या हॉटेलचं नाव, कोकोश्यामबाला.. याच कोकोश्यामबालामध्ये त्याने मुक्काम केला. या हॉटेलमध्ये यापूर्वी अनेक अभिनेते तसंच क्रिकेटपटूही येऊन गेले आहेत. तर सचिनने पहिल्यांदाच आपला वाढदिवस निसर्गरम्य सिंधुदुर्गात साजरा केला. काल सचिन मित्र आणि कुटुंबीयांसमवेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला आणि तिथे जाऊन त्याने ब्लू फ्लॅग मानांकन मिळालेल्या भोगवे किनारी फेरफटका मारला. यावेळी भोगवे किनारी असलेल्या पर्यटकांच्या इच्छेला मान देत त्याने त्यांच्यासोबत फोटो देखील काढले. सचिन तेंडुलकरसोबत त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फोटो काढता आल्याचा आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्याचसोबत परुळे येथील माचली रिसॉर्टला सचिन, पत्नी अंजली तेंडुलकर, कन्या सारा तेंडुलकर आणि सचिनच्या मित्रांनी भेट दिली.
Also Read  Godrej Forte Pro 40 Litres Digital Electronic Safe Locker for Home & Office with Motorized Locking Mechanism (Light Grey)

Sachin Tendulkar Birthday Celebration : सचिनने मालवणी जेवणाचा आस्वाद  कोणत्या हॉटेलमध्ये घेतला?

सचिन तेंडुलकर, त्याचे मित्र आणि कुटुबीयांनी माचली  रेस्टॉरंटमध्ये मालवणी जेवणावर ताव मारला.  हे माचली रेस्टॉरंट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील परुळे गावात आहे. याच माचली रेस्टॉरंटमध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनीही मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला. माचली हा एक मालवणी शब्द आहे. जो झाडावर बसण्यासाठी केलेली बैठक व्यवस्था आणि त्यावर उन, पावसामुळे त्रास होऊ नये म्हणून केलेलं छप्पर बनवून केलेलं छोटी झोपडी असते त्याला माचली असं म्हणातात. म्हणजे घाटावरच्या भाषेत मचाण.. तश्याच पद्धतीचा लूक हॉटेलला देऊन बनवलेलं हे माचली रेस्टॉरंट. याच माचली रेस्टॉरंट क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनीही मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला.

Also Read  पपईसोबत 'ही' फळं खाल्याने तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

“भरलेला बांगडा, कोळंबी फ्राय, ‘माशाचा मालवणी तिखला,’ कोंबडी रस्सा, वडे-सागोती, गोलमा अशा अस्सल झणझणीत मत्स्याहारी आणि मांसाहारी मालवणी पदार्थांवर यथेच्छ ताव मारत ‘क्रिकेटच्या देवा’ने अर्थात खवैय्या सचिन तेंडुलकरने या सुग्रास भोजनाला दिलखुलास दाद दिली. परुळे येथील माचली रिसॉर्टला सचिन, पत्नी अंजली तेंडुलकर, कन्या सारा तेंडुलकर व सचिनच्या मित्रांनी भेट दिली. आपल्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त भोगवे दौऱ्यावर आलेल्या सचिनने खास मालवणी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. शाकाहारी पदार्थांमध्ये आमरसासह हापूस आंबे तसेच कैरीचे लोणचे, कैरीची चटणी, सांगितले. कंद मुळाची भाजी, काजू-शहाळ्याची भाजी, भात, सोलकढी, निरफणसाची कापे, बोंडू रायता अशा पदार्थांचीही यावेळी रेलचेल होती. सचिनचे कुटुंब आणि मित्र मिळून सुमारे तीसजणांनी या पंक्तीत एकत्र जेवण घेतले.

Also Read  Drinking Water Before Tea तुम्हाला चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय आहे का? याबद्दल सविस्तर जाणून घ्या

सचिनने कुटुंबियांसह मित्रमंडळींनी गाण्यांच्या मैफिलीसह आनंद लुटला. सचिनने आपला पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली. सचिनने माचली रिसॉर्ट फिरून पाहिले आणि समाधान व्यक्त केले. कुटुंबिय व सहकाऱ्यांसह त्याने गप्पा-गाण्यांची मैफिल रंगविली. दिवसभर सचिन मित्रांच्या गराड्यात गप्पांमध्ये रमला होता.

महत्वाच्या बातम्या-

Sachin Tendulkar Birthday : सचिन तेंडुलकरच्या 50 व्या वाढदिवासानिमित्त चाहत्याकडून अनोखी मानवंदना!

1 thought on “कोकणात किनाऱ्यावर क्रिकेट खेळत आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घेत सचिनने साजरा केला वाढदिवस”

  1. Pingback: Ice Cream Side Effects :कडक उन्हाळा आहे म्हणून आईस्क्रीम खात असाल, तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो - आपला अभ्य

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?