RCB IPL 2023 : रजत पाटीदारला रिप्लेस करणारा वैशाक कुमार आहे तरी कोण?

RCB IPL 2023 : रजत पाटीदारला रिप्लेस करणारा वैशाक कुमार आहे तरी कोण?

Rate this post

RCB IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगमात आरसीबीच्या संघाला दुखापतीचे ग्रहण लागलेय. रीस टोपली, रजत पाटीदार आणि जोश हेजलवूडसारखे खेळाडू दुखापतग्रस्त झाले. जोश हेजलवूड दुखापतीमुळे अर्ध्या आयपीएल हंगामाला मुकणार आहे. आरसीबीने रीस टोपली आणि रजत पाटीदार यांची रिप्लेसमेंट केली आहे. रीस टोपलीच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या वेन पार्नेल याला ताफ्यात घेतलेय. तर रजत पाटीदारच्या जागी कर्नाटकच्या वैशाक विजय कुमार याची निवड केली आहे. आरसीबीने वैशाक विजय कुमार याला 20 लाख रुपायामध्ये ताफ्यात घेतले आहे. 26 वर्षीय वैशाक कुमार कर्नाटकसाठी वेगवान गोलंदाजी करतो.

Also Read  IPL 2023 : आरसीबीने नाणेफेक जिंकली, केकेआरची प्रथम फलंदाजी, दोन्ही संघात बदल

रीस टोपली खांद्याच्या दुखापतीमुळे तर रजत पाटीदार पायाच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर केलेत. त्याजागी वेन पार्नेल आणि वैशाक कुमार याला घेतले आहे. वेन पार्नेल आयपीएलमध्ये पुणे वॉरिअर्स आणि दिल्लीकडून 26 सामने खेळलाय. 2014 मध्ये पार्नेल याने अखेरचा आयपीएल सामना खेळलाय. रजत पाटीदारच्या जागी आरसीबीच्या ताफ्यात आलेला वैशाक विजय कुमार कोण आहे…

Also Read  IPL 2023 : चीअर लीडर्सची कमाई ऐकाल तर हैराण व्हाल, सेलिब्रेटीही मागे पडतील 

कोण आहे वैशाक विजय कुमार

26 वर्षीय वैशाक विजय कुमार याची पहिल्यांदाच आयपीएलमध्ये वर्णी लागली आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. कर्नाटक संघाकडून वैशाक याने भेदक मारा केलाय. सैय्यद मुश्ताक अली चषकात त्याने 8 टी 20 सामन्यात 10 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर रणजी चषकातही त्याने भेदक गोलंदाजी केल्या. त्याने रणजीच्या 8 सामन्यात 25 च्या सरासरीने 31 विकेट घेतल्या आहे.

RCB Wayne Parnell : वेन पार्नेल आरसीबीच्या ताफ्यात

वेन पार्नेलही दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएलच्या लिलावात पार्नेल ची किंमत 75 लाख रुपये होती. पण तो लिलावात विकला गेला नव्हता. वेन पार्नेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 26 सामने खेळला आहे. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 63 धावा आणि 26 विकेट घेतल्या आहेत. पार्नेलने त्याच्या कारकिर्दीत फारशी फलंदाजी केलेली नाही पण, त्याने मोजके चांगले षटकार ठोकले आहेत. यासोबतच त्याला विकेट घेण्याची कला चांगलीच अवगत आहे. (IPL 2023, RCB Reece Topley’s Replacement Wayne Parnell )

Also Read  लॉर्ड शार्दूलच्या वादळानंतर फिरकीचा तडाखा, कोलकात्याचा आरसीबीवर विराट विजय

आणखी वाचा :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?