RCB in IPL 2023 : आयपीएलमध्ये आरसीबीला आतापर्यंत एकही चषक उंचावता आला नाही. प्लेऑफमध्ये अनेकदा पोहचूनही आरसीबी ट्रॉफी उंचावता आलेली नाही. आरसीबीच्या कट्टर चाहत्यांच्या मनात ही खल कायम आहे. प्रत्येक हंगामाआधी चाहत्यांना आरसीबीकडून चषकाची आपेक्षा असते, पण अखेरीस ती अपूर्णच राहते. यंदाही आरसीबीच्या चाहत्यांना चषकाची आपेक्षा आहेच… एका चाहतीने तर आरसीबी चिंकल्याशिवाय लग्नच करणार नाही, असे ठरवलेले दिसतेय. या तरुणीचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोलकाता आणि आरसीबी यांच्यात ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यादरम्यानचे हे पोस्टर आहे. आरसीबी आयपीएल ट्रॉफी जिंकल्याशिवाय लग्न करणार नाही.. असे लिहिलेले आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याआधीही अशाच प्रकारची पोस्टर्स व्हायरल झाली आहेत.
विशेष म्हणजे, आरसीबी IPL जिंकल्याशिवाय लग्न करणार नाही असे पोस्टर घेऊन स्टेडिअममध्ये गेलेल्या महिलेचे लग्न झाल्याचा दावा युजर्सने केला आहे. पोस्टर घेऊन स्टेडिअममध्ये गेलेल्या या महिलेचे लग्न झालेले आहे. ती माझी शेजारीन आहे, असे युजर्सने म्हटलेय. लोकेश सैनी असे त्या ट्वीटर युजर्सचे नाव आहे. लोकेश सैनी याच्या या ट्वीटवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. एका युजर्सने म्हटले की, त्या महिलेचा हा फोटो तिच्या नवऱ्याला दाखव.. त्याशिवाय अन्य एका युजर्सने म्हटलेय की, तिला दुसरे लग्न करायाचे.. अशा कमेंट्स केल्या जात आहेत.
RCB IPL2023 दारुण पराभव
लॉर्ड शार्दूल ठाकूर याच्या वादळी अर्धशतकानंतर फिरकीच्या तडाख्यात आरसीबीचा संघाची दाणादाण उडाली. एकतर्फी सामन्यात कोलकात्याने आरसीबीचा 81 धावांनी पराभव केला. कोलकात्याने दिलेल्या 205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने 123 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीला संपूर्ण 20 षटकेही फलंदाजी करता आली नाही. कोलकात्याच्या फिरकीसमोर आरसीबीचा डाव कोसळला.
205 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी वादळी सुरुवात केली. पहिल्या चेंडूपासूनच दोघांनी कोलकात्याच्या गोलंदाजावर हल्लाबोल केला. पण विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढासळली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी 4.5 षटकात 44 धावांची सलामी दिली. विराट कोहली 21 धावा काढून बाद झाला. विराटनंतर फाफही फार काळ मैदानावर टिकला नाही. फाफही 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल यानेही विकेट फेकली. मॅक्सवेल याला फक्त पाच धावा करता आल्या. महत्वाचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी कोलमडली.