Petrol Diesel Price on 25 April 2023: भारतात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) दररोज जारी केले जातात. आजच्या दरांबाबत बोलायचं झालं तर मंगळवार 25 एप्रिल 2023 रोजी अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलल्या आहेत. देशातील दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या महानगरांमध्ये किमती स्थिर आहेत. दुसरीकडे, आज चेन्नईमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरांत बदल झाला असून, चेन्नईमध्ये पेट्रोल 10 पैसे आणि डिझेल (Diesel) 9 पैशांनी महाग झालं असून पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.
आजचे कच्च्या तेलाचे दर
मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतींत घसरण नोंदवली जात आहे. WTI क्रूड ऑईलच्या (WTI Crude Oil) किमतीत 0.09 टक्क्यांची किंचित घट नोंदवली गेली आहे आणि ते प्रति बॅरल 78.69 डॉलरवर व्यापार करत आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 0.11 टक्क्यांनी घसरली आहे आणि प्रति बॅरल 82.64 डॉलरवर व्यापार करत आहे.
आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?
-
- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
-
- मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
-
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
देशात मे 2022 नंतर किंमतींमध्ये कोणताही बदल नाही
- शेवटच्या वेळी पेट्रोल-डिझेलचे दर मे 2022 मध्ये बदलले होते. त्यानंतर पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये उत्पादन शुल्क कमी करण्यात आलं. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 9.5 आणि 7 रुपयांनी कमी झाले आहेत. जुलै 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 5 आणि 3 रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील दर आणखी घटले होते.
Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
купить аккаунт аккаунты с балансом
перепродажа аккаунтов услуги по продаже аккаунтов
купить аккаунт с прокачкой https://magazin-akkauntov-online.ru/
маркетплейс аккаунтов аккаунты с балансом
гарантия при продаже аккаунтов купить аккаунт
перепродажа аккаунтов маркетплейс аккаунтов соцсетей
перепродажа аккаунтов https://pokupka-akkauntov-online.ru/
Sell Account Account Store
Gaming account marketplace Account Buying Service