पपईसोबत ‘ही’ फळं खाल्याने तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

पपईसोबत ‘ही’ फळं खाल्याने तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

Rate this post

Papaya Bad Food Combinations : पपई (papaya) हे आरोग्यासाठी आवश्यक फळ आहे. याचे अनेक फायदे आहेत. पण याचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेसुद्धा आहेत. पपईसोबत जर तुम्ही काही फळं खाल्ली तर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम (bad effect) होण्याची शक्यता आहे.  पपईत अनेक पोषण तत्त्वे असतात, ज्यामुळे शरीर आरोग्यदायी राहण्यास मदत होते. डाएट हेल्दी बनवण्यासाठी प्रामुख्याने पपईचा वापर करण्यात येतो. पपई रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. पपईमुळे अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. फायदे असूनही पपई आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.फायद्यांबरोबरच पपईचे धोकादायक परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. जर तुम्ही पपईसोबत ‘ही’ फळं(fruits) खाल्ली तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया कोणते आहेत ‘ही’ फळं.

Also Read  Health Tips : तुमचे डोळे वारंवार लाल होतात? ही सामान्य समस्या नाही तर आहे गंभीर आजार; वेळीच सावध व्हा

लिंबू

पपई आणि लिंबू दोन्हीही शरीरासाठी फायदेशीर आहेत. पण यांना जर एकत्र करुन खाल्ले तर त्याचा वाईट परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. जर तुम्ही पपईचा वापर सलाडमध्ये करत असाल आणि त्यात लिंबू पिळले तर ते सलाड तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. दोन्ही एकत्र खाल्ल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण बिघडू शकते.

Also Read  Food Coma :दुपारी जेवण केल्यानंतर तुम्हाला झोप येत असेल, तर वेळीच सावध व्हा!

संत्री

लिंबासारखेच संत्रीदेखील आंबट फळांमध्ये येते. पपई आणि संत्री चुकनही एकत्र खाऊ नये. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. तसेच इतरही वाईट परिणाम होऊ शकतात.

केळी

पौष्टिक फळांमध्ये केळ्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. पण चुकनही पपईसोबत केळी खाऊ नये. त्यामुळे पचनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. 

Also Read  Apple Store : देशातलं 'Apple'चं पहिलं स्टोअर मुंबईत, Tim Cook यांच्या उपस्थितीत उद्घाटन

दूध

पपईमध्ये पॅपेन नावाचे एंझायिम असते. जे दुधाच्या प्रथिनांना शरीराच्या आतमध्ये तोडू शकते. ज्यामुळे तुम्हाला अपचन,सूज आणि पचनाशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे दुधाबरोबर कधीही पपई खाणे टाळावे.

संबंधित बातमी : 

Health Tips: कलिंगडावर मीठ टाकून खाताय? लवकर बदला ही सवय अन्यथा होईल आरोग्यावर परिणाम

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

1 thought on “पपईसोबत ‘ही’ फळं खाल्याने तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम”

  1. Pingback: Excessive Use Of Garlic:तुम्ही भाजीत जास्त प्रमाणात लसूण वापरताय? आरोग्यावर होईल 'असा' परिणाम - आपला अभ्यास- Ap

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?