Old Pension Scheme : तासाभरात संप मागे घेणार? सरकार अन् संपकऱ्यांमध्ये यशस्वी तोडगा- सूत्र

Rate this post

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये यशस्वी तोडगा निघाल्याची माहिती आहे.

संप मागे घेण्याबाबत मसुदा तयार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे तासाभरात संप मागे घेण्याची घोषणा होऊ शकते. ‘साम टीव्ही’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. तोडग्याबाबतचा मसूदा संपकऱ्यांना मान्य होताच घोषणा होऊ शकते. हेही वाचाः अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य….

Also Read  Health Tips फळे आरोग्यासाठी फायदेशीर, पण दिवसाच्या 'या' वेळी खाल्ल्यास होतील गंभीर परिणाम; वाचा सविस्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावलेल्या शिष्टमंडळामध्ये १६ सदस्य होते. मागील काही वेळापासून संपकरी आणि सरकारसोबत चर्चा सुरु होती. ही चर्चा यशस्वी झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिक्षक आमदाराने नाकारली पेन्शनविधान परिषदेतले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विधान परिषद सभापतींना पत्र लिहून पेन्शन नाकारत असल्याचं म्हटलं आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन मिळत नसल्याने आणि शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या मोहीमेमध्ये सहभागी होत त्यांना पेन्शन घेण्यास नकार दिलेला आहे.

Also Read  Dabur Honey :100% Pure World's No.1 Honey Brand with No Sugar Adulteration, Squeezy Pack 700gm Buy 1 Get 1 Free

ज्ञानेश्वर म्हात्रे हे कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी शिक्षकांच्या मागण्यांसाठी पेन्शन नाकारली आहे. शिक्षकांनी जुनी पेन्शन मिळावी, अशी त्यांची मागणी आहे.

By
सकाळ डिजिटल टीम

1 thought on “Old Pension Scheme : तासाभरात संप मागे घेणार? सरकार अन् संपकऱ्यांमध्ये यशस्वी तोडगा- सूत्र”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?