नमस्कार मित्रांनो
आजच्या लेखामध्ये आपण जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचारी संप याबाबत सरकारने काय भूमिका घेतली त्याबद्दल ताजी घडामोडी बघणार आहोत.
आजपासून जुनी पेंशन योजना लागू करावी मुख्यत: या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यासाठी मोर्चाही काढण्यात येणार आहे. यासंपात राज्यातलील १९ लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. तर दुसरीकडे संपात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगरण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. (
प्राथमिक शिक्षक संघ यांची संपातून माघार-संभाजी थोरात यांनी केली घोषणा
Action taken against government employees participating in strike )
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम 6च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय- निमशासकीय कर्मचारी यांच्या संघटनेने पुकारलेला हा संप बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे या संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.त्या बाबतीत महाराष्ट्र राज्य सरकारने १३ मार्सूच ला gr काढून सुचित केलेले आहे.