New Jobs In Phone Manufacturing   केंद्र सरकारच्या पीएलआय योजनांमुळे स्मार्टफोन निर्मितीमधून दीड लाखांवर नोकऱ्यांची अपेक्षा

New Jobs In Phone Manufacturing केंद्र सरकारच्या पीएलआय योजनांमुळे स्मार्टफोन निर्मितीमधून दीड लाखांवर नोकऱ्यांची अपेक्षा

Rate this post

New Jobs In Phone Manufacturing : स्मार्टफोन निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या तंत्रज्ञान आणि उत्पादन कंपन्यांना भारतात येण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश येत आहे. चालू आर्थिक वर्षात देशात स्मार्टफोन उत्पादनातून नवीन 1,50,000 नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार रिक्रूटमेंट फर्मच्या अधिकार्‍यांचा हवाला देऊन याबाबत माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार अग्रगण्य फोन निर्मितीमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणात नोकरभरतीची योजना आखत आहेत.

भारत सरकारच्या PLI योजनेमुळे फरक

केंद्र सरकारच्या production-linked incentives (PLI) scheme योजनेच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात फोन निर्मितीमध्ये 1,50,000 नवीन नोकऱ्यांची अपेक्षा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमुळे चीनबाहेर उत्पादनासाठी जागतिक बदल आणि भारत सरकारच्या उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेमुळे हे होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

Also Read  आजपासून मुंबईत अॅपलचं स्टोअर सुरू, देशातील पहिलं अधिकृत स्टोअर

TeamLease, Randstad, Quess, आणि Ciel HR Services ने दिलेल्या माहितीनुसार, या आर्थिक वर्षात या क्षेत्रात निर्माण होणार्‍या अंदाजे 120,000-150,000 नवीन रोजगारांपैकी सुमारे 30,000-40,000 नवीन रोजगारांची शक्यता आहे. उर्वरित अप्रत्यक्ष पदांसह, उत्पादन क्षेत्रात असतील. सॅमसंग, नोकिम फॉक्सकॉन, विस्ट्रॉन, पेगाट्रॉन, टाटा ग्रुप आणि सॅलकॉम्प सारख्या मोठ्या कॉर्पोरेट दिग्गज कंपन्या देशात त्यांचे कर्मचारी वाढवतील असे या अहवालात म्हटले आहे.

नोकरभरतीत वाढ दिसून येत आहे

टीमलीज सर्व्हिसेसच्या स्टाफिंगचे सीईओ कार्तिक नारायण यांनी इकॉनॉमिक टाईम्सशी बोलताना सांगितले, बहुतेक मोबाइल ब्रँड आणि त्यांचे घटक उत्पादन आणि असेंब्ली पार्टनर ज्यांच्याकडे भारतात आधीपासून काही प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग आहे तसेच ते नव्याने स्थापन करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी भरती वाढवली आहे.  ते पुढे म्हणाले की TeamLease कडे सध्या या जागेत 2,000 हून अधिक प्रस्ताव असून आणि आणखी सुद्धा त्याच मार्गावर आहेत. दरम्यान, अहवालानुसार Quess आणि Ciel HR अधिकार्‍यांनी सांगितले की त्यांनी FY23 च्या तुलनेत या आर्थिक वर्षात 100 टक्के वाढ केली आहे.

Also Read  Samsung Galaxy S24 Series सॅमसंगच्या युजर्ससाठी खुशखबर ; लवकरच Galaxy S24 सीरीज भेटीला?

Ciel HR सर्व्हिसेसचे CEO आदित्य नारायण मिश्रा म्हणतात की, भारतातील मोबाईल उत्पादकांनी मागणी वाढण्याच्या अपेक्षेने पुन्हा भरती सुरू केली आहे. चिपच्या (सेमीकंडक्टर) तुटवड्याचा पुरवठा साखळीचा मुद्दा आता त्रासदायक ठरणार असे दिसत नाही. आम्ही टेक्निशियन, सुपरव्हायरझर आणि क्वाॅलिटी अॅस्युरन्स (quality assurance) मागणी गेल्या दोन तिमाहीत पाहिल्या गेलेल्या सरासरी मागणीच्या तुलनेत जवळपास दुप्पट असल्याचे पाहिले आहे.

Also Read  दोन्ही पायांनी अपंग असताना 10 एकर शेती फुलवली; नांदेडच्या तरुणाची प्रेरणादायी यशोगाथा

टीमलीजचे नारायण म्हणाले की, सरकारची पीएलआय योजना आणि अनेक कंपन्यांचे उत्पादन भारतात हलवण्याच्या दीर्घकालीन नियोजनातून प्रथम स्थानिक बाजारपेठ काबीज करून उत्पादन वाढवण्याचे नियोजन आहे. त्यानंतर उर्वरित जगाला मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याचे उदिष्ट असेल. यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी मदत होईल.

इतर महत्वाच्या बातम्या :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?