MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच ‘या’ जागेचं उद्घाटन

MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच ‘या’ जागेचं उद्घाटन

4/5 - (1 vote)

MS Dhoni : 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये कॅप्टन कूल धोनीनं दणदणीत षटकार खेचला आणि समस्थ भारतीयांनी तो ऐतिहासिक क्षण आणि धोनी या दोघांनाही डोक्यावर घेतलं… धोनीच्या याच कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय..  धोनीनं मारलेल्या त्या षटकारातला चेंडू ज्या ठिकाणी पडला त्या जागेला एमसीएनं धोनीचं नाव दिलंय… आज दस्तुरखुद्द धोनीनं वानखेडे स्टेडियमवर येत या जागेचं उद्घाटन केलयं.

Also Read  MCA Head Coach : ओमकार साळवी मुंबईच्या मुख्य प्रशिक्षकपदी, समीर दिघे एमसीए प्रभारी

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं २०११ साली वानखेडे स्टेडियमवरच्या विश्वचषक अंतिम सामन्यात ठोकलेल्या निर्णायक षटकाराची आठवण प्रत्येक भारतीयाच्या मनात आजही कायम आहे. याच आठवणीचं कायमस्वरुपी जतन करुन ठेवण्यात आले आहे. धोनीच्या त्या विजयी षटकारानंतर चेंडू वानखेडे स्टेडियमच्या विठ्ठल दिवेचा स्टॅंडमध्ये जिथं पडला, त्या खुर्च्यांच्या ठिकाणी धोनीच्या नावानं भारताच्या विश्वचषक विजयाचा स्मृतिफलक  उभारण्यात येणारेय. त्याचे आज दस्तुरखुद्द धोनीनं वानखेडे स्टेडियमवर येत या जागेचं उद्घाटन केलयं. एएनआयने याचा व्हिडीओ पोस्ट केलाय.

Also Read  अपलचे भारतातील पहिले रिटेल स्टोअर मुंबईत, पहिली झलक समोर; लवकरच ग्रॅण्ड ओपनिंग

वानखेडे स्टेडिअमवर २०११ च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये धोनीचा मॅच विनिंग षटकार आणि रवी शास्त्री यांचे समालोचन प्रत्येकाची उत्कंठा वाढवणारे होते. आजाही तो क्षण प्रत्येक क्रीडा प्रेमींच्या डोळ्यासमोर आहे. दोन एप्रिल २०११ रोजी धओनीने श्रीलंकेच्या नुवान कुलशेखरा याला षटकार लगवात भारताला विश्वचषक जिंकून दिला होता. तो क्षण हजारो भारतीयांसाठी अभिमानाचा होता.. धोनीचा हाच षटकार अजरामर झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?