MI vs RR IPL 2023 Live: मुंबई-राजस्थानमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

MI vs RR IPL 2023 Live: मुंबई-राजस्थानमध्ये लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Rate this post

MI vs RR IPL 2023 Live: आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आज रविवारी डबल हेडर सामने रंगणार आहे. आज, 30 एप्रिल रोजी दुसरा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघामध्ये पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या घरच्या मैदानावर आजचा सामना रंगणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएल गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स सध्या दुसऱ्या स्थानावर तर मुंबई नवव्या स्थानावर आहे.

IPL 2023, MI vs RR : मुंबई आणि राजस्थान आमने-सामने
आजचा सामना जिंकून (RR vs MI) दोन्ही संघ अधिक गुण मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2023 Points Table) उडी मारण्याचा प्रयत्न करतील. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हा यंदाच्या मोसमातील आघाडीच्या संघांपैकी एक आहे. राजस्थान संघ यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. राजस्थानने आतापर्यंत आठ पैकी पाच सामन्यांत विजय मिळवला आहेत. तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत.

Also Read  IPL 2023 GT vs DC Match Preview :दिल्ली विजयी मार्गावर परतणार की गुजरात वरचढ ठरणार? पाहा हेड टू हेड आकडेवारीमध्ये कुणाचं पारड जड

MI vs RR Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई (Mumbai Indians) संघाचं पारड जड असल्याचं पाहायला मिळतं. मुंबई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 14 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान (Rajasthan Royals) संघाला 12 सामने जिंकण्यात यश मिळालं आणि एक सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 आहे.

Also Read  Team India Captaincy Virat Kohli vs Rohit Sharma:कोहलीकडे पुन्हा टीम इंडियाची कमान? रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; रोहित शर्माबद्दल म्हणाले...

Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध राजस्थान सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही हीच धावसंख्या दिसून आली आहे. वानखेडेच्या सपाट मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यात विशेष मदत मिळत नाही. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं.

MI vs RR, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आज, 30 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.

Also Read  Good Sweetener For Health :साखरेला पर्याय म्हणून गुळाचा, ब्राऊन शुगरचा वापर करताय? खरंच आहे का फायदेशीर? जाणून घ्या...

IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) ‘जिओ सिनेमा’ ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?