Medicine : कॅल्शियम, मल्टिव्हिटामिन, अँटिबायोटिक्ससह अशी 48 औषधं आहेत जी गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरली आहेत. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने आपल्या तपासणी अहवालात असं उघड केलंय की अशी 48 औषधे आहेत जी त्यांच्या गुणवत्ता तपासणीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात एकूण 1497 औषधांची गुणवत्ता तपासण्यात आली होती. त्यापैकी 48 औषधे बिनकामी असल्याचं सिद्ध झालं. या तपासणीत असे दिसून आलंय की यापैकी तीन टक्के औषधे मानवी वापरासाठी योग्य नाहीत.
या औषध कंपन्यांचा समावेश आहे
औषधी आणि वैद्यकीय उपकरणं, सौंदर्यप्रसाधने उत्तम दर्जाची नसल्याचे आढळून आलंय. या गोष्टी मानवी वापरासाठी योग्य नाहीत. ही औषधे बनावट, भेसळयुक्त किंवा चुकीच्या ब्रँड्सची आहेत. CDSCO च्या चाचणी अहवालात उत्तराखंडमध्ये 14, हिमाचल प्रदेशात 13, कर्नाटकातील 4, हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये प्रत्येकी 2-2 आणि गुजरात, मध्य प्रदेश, सिक्कीम, जम्मू आणि पुद्दुचेरीमधील प्रत्येकी एक औषधांचा समावेश आहे. PSU कर्नाटक अँटिबायोटिक्स आणि फार्मास्युटिकल्स, उत्तराखंड-आधारित सिनोकेम फार्मास्युटिकल्स, हरियाणा-आधारित नेस्टर फार्मास्युटिकल्स, उत्तर प्रदेश-आधारित JBJM पॅरेंटरल, सोलन-आधारित रोनाम हेल्थकेअर आणि मुंबई-आधारित ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्ससह ही औषधं खाजगी आणि सरकारी औषध निर्मात्यांद्वारे उत्पादित केली जातात.
CDSCO च्या अहवालानुसार, या औषधांमध्ये Lycopene Mineral Syrup सारखी औषधं देखील समाविष्ट आहेत, ज्याचा वापर लोक मोठ्या प्रमाणात करतात. याशिवाय व्हिटॅमिन सी इंजेक्शन, फॉलिक अॅसिड इंजेक्शन, अल्बेंडाझोल, कौशिक डॉक-500, निकोटीनामाइड इंजेक्शन, अमोक्सॅनॉल प्लस आणि अल्सिफ्लॉक्स सारखी औषधं आहेत. ही औषधं जीवनसत्वाची कमतरता दूर करण्यासाठी, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, अॅलर्जी टाळण्यासाठी, अॅसिड नियंत्रित करण्यासाठी आणि बुरशीजन्य संसर्ग दूर करण्यासाठी वापरली जातात.
या औषधांमध्ये एका प्रसिद्ध कंपनीची टूथपेस्टही निकषात नापास झाल्याचं आढळून आले आहे, ज्याचा वापर लोक खूप करतात. या तपासणीत नाकाम झालेल्या औषधांबाबत फार्मा कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्याचं उत्तर मागविण्यात आले आहे. सर्व औषध निरीक्षकांना फार्मा कंपन्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सगळ्या औषधांच्या अहवालापैकीच एक माहिती अशी आहे की, सीडीएससीओचे काम औषधांच्या बाबतीत काय असायला हेव तर, CDSCO दर काही महिन्यांनी वेगवेगळ्या फार्मा कंपन्यांच्या औषधांचे नमुने तपासत असते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यात जवळपास 50 औषधे निकामी झाली होती. त्यात प्रतिजैविकांचा समावेश होता. अखेर महत्वाचा मुद्दा हा आहे की ग्राहक अथवा रुग्ण जी काही औषधं घेतात आणि सेवन करतात ती योग्य ती खात्रीलायक बाबींनी घेणं गरजेचं आहे. सेवन करत असलेल्या औषधांची खात्री करुन घेणं अत्यंत आवश्यक हे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )