Mahindra Thar SUV:लवकरच येणार महिंद्रा थारचं नवीन डिझाइन आंतरराष्ट्रीय बाजारात लाँचिंगसाठी तयारी

Mahindra Thar SUV:लवकरच येणार महिंद्रा थारचं नवीन डिझाइन आंतरराष्ट्रीय बाजारात लाँचिंगसाठी तयारी

Rate this post

Mahindra Thar SUV : महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) ची थार (Thar) ही भारतातील सर्वात लोकप्रिय SUV कार आहे. परंतु, ट्रेडमार्कच्या काही कारणांमुळे अद्याप थारला आंतरराष्ट्रीय ओळख मिळू शकलेली नाही. थारच्या डिझाइनला जीप (Jeep) कंपनी नेहमी कोर्टात आव्हान देते. त्यामुळे थारची इतरांपेक्षा वेगळी डिझाइन बनवण्याच्या प्रयत्नात महिंद्रा (Mahindra) कंपनी आहे.

अमेरिकेत (America) 2020 मध्ये थार पहिल्यांदा लाँच केली गेली. परदेशी बाजारपेठेत थार लाँच करण्याची ही पहिलीच वेळ होती. ज्यामध्ये, युनायटेड स्टेट्स इंटरनॅशनल ट्रेड कमिशनच्या निर्णयानुसार, रॉक्सर ही थारची अमेरिकन आवृत्ती जीपच्या डिझाइन ट्रेडमार्कचे उल्लंघन करत असल्याचे आढळले.

कंपनीने अमेरिकेत रॉक्सर (Roxor) च्या आयात आणि विक्रीवर प्रभावीपणे बंदी घातली गेली. महिंद्राने नंतर रॉक्सरला नवीन डिझाइनमध्ये सादर केले, ज्याला सुरुवातीला मान्यता मिळाली. मात्र, नंतर पुन्हा 2022 मध्ये एफसीए (FCA) कडून डिझाइनवर आक्षेप घेण्यात आला. हा खटला अद्याप सुरू असून, त्यात महिंद्राच्या बाजूने निकाल लागणे अपेक्षित आहे.

Also Read  happy gudipadwa: गुढीपाडवा सण साजरी करण्याची पद्धत

ऑस्ट्रेलियातही चालली नाही थार

महिंद्राने भारतातील आपली ‘थार’ ऑस्ट्रेलियामध्ये लाँच करण्याची योजना आखली होती, परंतु तिथेही महिंद्रा (Mahindra) कंपनी कायदेशीर लढाईत अडकली. ऑस्ट्रेलियातही त्याला जीपनेच आव्हान दिले होते. याआधीच अमेरिकेत केस हरलेल्या थारला ऑस्ट्रेलियातही पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, कंपनी अजुनही थार उपलब्ध पर्यायांवर विचार करत आहे.

डिझाइन होणार अपग्रेड

नवीन डिझाईनबाबत महिंद्रा ऑटोमोटिव्हचे प्रादेशिक प्रमुख जॉयदीप मोईत्रा यांनी माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, थार सध्याच्या भारतीय स्वरूपात कोणत्याही आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच होणार नाही. कारण एफसीए आणि जीप पुन्हा थारला आव्हान देऊ शकतात. थार आणि जीपच्या रँग्लर एसयुव्हीच्या डिझाइनमध्ये बरंच साम्य आहे, त्यामुळे कंपनीने थारच्या डिझाइनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Also Read  Honda Shine 100 vs Hero Splendor vs Bajaj Platina:कमी किमतीत नवी बाईक घ्यायचा विचार करताय? मग या तीन बाईकबद्दल नक्की वाचा!

परदेशी बाजारपेठांसाठी नवीन डिझाइन

थारच्या नवीन डिझाइनबद्दल बोलताना मोइत्रा यांनी सांगितलं की, आम्ही थारच्या वेगळ्या डिझाइन्सवर काम करत आहोत, महिंद्राची नवीन थार ही परदेशी बाजारपेठांसाठी तयार केली जात आहे. या थारचं प्रोफाइल आणि डिझाइन वेगळं असेल आणि किमतीतही फरक असेल. थारचं डिझाइन तयार झाल्यानंतर ती ऑस्ट्रेलियातही लाँच केली जाणार आहे. 2021 मधील ऑस्ट्रेलियन न्यायालयाच्या निर्णयानुसार, महिंद्राला यासाठी जीपकडून डिझाइनची मंजुरी घ्यावी लागेल, जेणेकरून नंतर डिझाइन ट्रेडमार्क उल्लंघनाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे, पूर्णपणे नवीन स्वरूपात थार डिझाइन करणे हे महिंद्रासाठी योग्य पाऊल असू शकते.

Also Read  रेनॉल्टची नवी कार; डिस्काऊंट आणि ऑफरसह Renault Kiger 2023 लॉन्च, पाहा फिचर्स...

महिंद्राकडे होता डिझाइन कॉपी करण्याचा परवाना

भारतामध्ये 1950 मध्ये थारचे प्रथम लाँचिंग झाले, ज्यासाठी महिंद्राकडे अमेरिका वापरत असलेल्या विलीस जीप (Willys Jeep) चे डिझाइन कॉपी करण्याचा परवाना होता. त्यानंतर भारतात थारचे अनेक डिझाइन्स आले. मात्र, परदेशात महिंद्राच्या थारवर कॉपीराईट क्लेम जारी होत आहेत. जीप कंपनीकडून थारच्या डिझाइनवर आक्षेप घेतला जातोय. त्यामुळेच, आंतरराष्ट्रीय बाजारांसाठी कंपनी आता कारसाठी इतर कंपन्यांपेक्षा वेगळे डिझाइन तयार करत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

 

 

2 thoughts on “Mahindra Thar SUV:लवकरच येणार महिंद्रा थारचं नवीन डिझाइन आंतरराष्ट्रीय बाजारात लाँचिंगसाठी तयारी”

  1. Pingback: Citroen C3 Aircross Hyundai Creta: की Kia Seltos? तुमच्यासाठी कोणती कार बेस्ट? वाचा सविस्तर... - आपला अभ्यास- Aplaabhyas

  2. Pingback: WTC 2023:टीम इंडियाला दुखापतीचा फटका,  कोण WTC फायनलमधून बाहेर तर काहींच्या खेळण्यावर सस्पेन्स - आपला अभ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?