ISRO VSSC Recruitment 2023: मध्ये बंपर भरती; दरमाहा 1.42 लाखांपर्यंत वेतन मिळवण्याची संधी

ISRO VSSC Recruitment 2023: मध्ये बंपर भरती; दरमाहा 1.42 लाखांपर्यंत वेतन मिळवण्याची संधी

Rate this post

ISRO VSSC Recruitment 2023: विक्रम साराभाई स्पेस सेंटरनं विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती मोहिमेद्वारे, तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन – बी आणि रेडिओग्राफर – ए यासह सर्व पदं भरली जाणार आहेत. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छा आहे, ते सर्व उमेदवार अर्ज करु शकतात. इस्रोच्या अधिकृत वेबसाईटकडून ऑनलाईन अर्जाची लिंक सक्रिय केली जाईल, त्यानंतर इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. इस्रोनं जारी केलेल्या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेले नाही. इच्छुक उमेदवार 4 मे 2023 पासून अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2023 आहे. या भरती प्रक्रियेसाठी फॉर्म फक्त ऑनलाईन भरता येणार आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार इस्रो VSSC च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

Also Read  'एवढा पगार देऊ शकाल? माझा पगार तुम्ही उभारलेल्या फंडपेक्षा जास्त'; CEOची पोस्ट चर्चेत

अर्ज करण्यासाठी कोणती वेबसाईट पाहाल?

भरती प्रक्रियेसाठी इस्रोकडून लिंक सक्रिय केली जाणार आहे. अर्ज भरण्याची लिंक सक्रिय झाल्यानंतर उमेदवार ISRO विक्रम साराभाई स्पेस सेंटरच्या वेबसाईटवरून अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, अधिकृत वेबसाईट आहे, vssc.gov.in 

रिक्त पदांचा तपशील अद्याप जाहीर झालेला नाही. काही दिवसांत या वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती जाहीर केली जाईल.

रिक्त जागांचे तपशील 

    • एकूण पदं : 112
    • साइंटिफिक असिस्टंट : 2 पदं
    • लायब्ररी असिस्टंट : 1 पद
    • टेक्निशियन-बी : 43 पदं
    • ड्रॉट्समॅन-बी : 5 पदं
    • रेडियोग्राफर-ए : 1 पद
Also Read  पाणी टंचाई! जालन्याच्या अंबड तालुक्यातील 17 गावांमध्ये पाणी उपसा करण्यास बंदी

पात्रता काय आहे आणि अर्ज शुल्क किती?

रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता पदानुसार आहे. याविषयी सविस्तर माहिती काही वेळात उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, आपण अधिकृत वेबसाईटवरून याबद्दल तपशील जाणून घेऊ शकता. थोडक्यात, संबंधित क्षेत्रातील बीई, बीटेक, डिप्लोमा आणि आयटीआय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा देखील वयानुसार आहे. जोपर्यंत अर्ज शुल्काचा संबंध आहे, या पदांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

निवड कशी होईल, वेतन किती? 

रिक्त पदांसाठी उमेदवार निवडीबाबत उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल आणि लेखी परीक्षेनंतर कौशल्य चाचणी होईल. दोन्ही टप्पे पार करणाऱ्या उमेदवाराची निवड अंतिम मानली जाईल. निवड झाल्यावर, पगार 44,900 रुपये ते 1,42,400 रुपये प्रति महिना असतो.

Also Read  Ramzan Eid Celebration : देशभरात रमजान ईदचा मोठा उत्साह, महिनाभरच्या रोजानंतर सेलिब्रेशन

अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘एबीपी माझा’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिदी दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील. 

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?