IPL2023:राजस्थानला मोठा धक्का, जोस बटलर दुखापतग्रस्त; दिल्लीविरोधात प्लेईंग 11 च्या बाहेर

IPL2023:राजस्थानला मोठा धक्का, जोस बटलर दुखापतग्रस्त; दिल्लीविरोधात प्लेईंग 11 च्या बाहेर

Rate this post

Sanju Samson On Jos Buttler : अटीतटीच्या लढतीत पंजाबने राजस्थानचा पाच धावांनी पराभव केला. राजस्थान रॉयल्सचा (Rajatshan Royals)  पराभव तर झालाच, पण या सामन्यात त्यांना मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) फिल्डिंग करताना दुखापतग्रस्त झाला आहे. तो पुढील सामन्याला उपलब्ध नसेल, अशी माहिती राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) याने दिली आहे. राजस्थानचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरोधात (Delhi Capitals) होणार आहे.

पंजाबने दिलेल्या 198 धावांचा पाठलाग करताना राजस्थानकडून यशस्वी जायस्वालसोबत आर. अश्विन मैदानात उतरला होता. त्यानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पण सामन्यानंतर संजू सॅमसन याने याचे कारण दिले. फिल्डिंग करताना जोस बटलर याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला सलामीला फलंदाजीसाठी पाठवले नव्हते, असे संजू सॅमसन याने सांगितले. जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला, पण त्याला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. फिल्डिंग करताना जोस बटलर याला दुखापत झाली होती.

Also Read  WhatsApp च्या नवीन फिचर्समुळे कसा फायदा होईल?

पंजाबच्या शाहरुख खान याचा झेल घेताना जोस बटलर याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याने डीपच्या क्षेत्रातून पळत येत शाहरुखचा शानदार झेल घेतला होता. हा सामन्यातील सर्वोत्तम झेल देखील ठरला, त्याचा पुरस्कारही सामन्यानंतर बटलरला मिळाला होता. हा पुरस्कार घ्यायला येतानाही बटलरच्या बोटाला बँडेड पट्टी बांधलेली होती. त्यामुळे जोस बटलरऐवजी सलामीला अश्विनला पाठवण्यात आले होते. अश्विन बाद झाल्यानंतर बटलर मैदानावर आला होता. पण तो लगेच बाद झाला. सामन्यानंतर बोलताना संजू म्हणाला की, जोस बटलर दिल्लीविरोधातील सामना खेळू शकत नाही. झेल घेताना त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.

Also Read  Hanuman jayanti 2023 Hindi

अटीतटीच्या लढतीत पंजाबचा विजय

अटीतटीच्या लढतीत पंजाबने (Punjab Kings) राजस्थानचा (Rajatshan Royals)  पाच धावांनी पराभव केला. शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या अर्धशतकानंतर नॅथन एलिस याने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर पंजाबने राजस्थानचा पराभव केला. पंजाबने दिलेल्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघाने 192 धावांपर्यंत मजल मारली. शिमरोन हेटमायर आणि जुरेल यांनी विजयासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले, पण सॅम करन याने भेदक मारा करत पंजाबला विजय मिळवून दिला.

Also Read  CSK in IPL 2023:बापासोबत लेकही मैदानात, धोनी अन् झिवाचा खास अंदाज, चेन्नईने केला फोटो पोस्ट

आणखी वाचा :

IPL 2023: ‘थँक्स गॉड… उर्वशी नाही आली’, दिल्लीच्या सामन्यात पोस्टर व्हायरल, अभिनेत्री म्हणाली… 

IPL 2023 : आयपीएलवर कोरोनाचं सावट, बीसीसीआयकडून खेळाडूंना लाखमोलाचा सल्ला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?