IPL Points Table 2023 : बंगळुरूकडून लखनौचा 18 धावांनी पराभव, आयपीएल पॉईंट्स टेबलची स्थिती काय?

IPL Points Table 2023 : बंगळुरूकडून लखनौचा 18 धावांनी पराभव, आयपीएल पॉईंट्स टेबलची स्थिती काय?

Rate this post

IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 (IPL 2023) लखनौ सुपर जायंट्सने (LSG) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) विजय मिळवला. लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर आरसीबीने 9 गडी गमावून 126 धावा केल्या. प्रत्युत्तरात केएल राहुलचा संघ 19.5 षटकांत 108 धावांवर गारद झाला. बंगळुरूने लखनौवर 18 धावांनी  विजय मिळवला. आरसीबीच्या विजयानंतर आयपीएल गुणतालिकेत (IPL Points Table 2023) बदल झाला आहे. आरसीबीकडे आता 10 गुण असून संघ सहाव्या स्थानावर आहे. बंगळुरुने नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. पराभवानंतर लखनौ संघाकडेही दहा गुण आहे.

Also Read  राघव चढ्ढा आणि परिणीतीनं पाहिली आयपीएल मॅच

या सामन्यानंतर जर आपण आयपीएल 2023 च्या पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table 2023) सध्या आरसीबी सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, टॉप 4 मध्ये जाण्यासाठी त्याला आणखी सामने जिंकावे लागतील. तर, लखनौ सुपर जायंट्स पराभवानंतर दुसऱ्या क्रमांकावरून तिसर्‍या क्रमांकावर गेला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला फायदा झाला असून संघ उडी घेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्सकडे 10 गुण आहेत. या संघाने 9 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सध्या गुजरात टायटन्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. गुजरात संघाने आतापर्यंत आठ सामने खेळले असून त्यापैकी सहा सामन्यांत विजय मिळवला आहे. हार्दिक पांड्याचा संघ 12 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर लखनौ संघ आहे. चौथ्या क्रमांकावर चेन्नई संघ आहे. या संघाने 9 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत तर, 4 सामने गमावले आहेत.

Also Read  Godrej Security Solutions Forte Pro 30 Litres Digital Electronic Safe Locker for Home & Office with Motorized Locking Mechanism (Light Grey)

या विजयासह आरसीबी संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी पाचव्या स्थानावर असलेल्या पंजाब एक स्थान खाली घसरून आता सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंजाब संघाने नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकल्यानंतर पंजाबकडे 10 गुण आहेत. मुंबई संघ सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईने आठपैकी चार सामने जिंकले असून  संघाकडे आठ गुण आहेत. कोलकाता संघ आठव्या स्थानावर असून संघाकडे सहा गुण आहेत. कोलकाता संघाने नऊ सामन्यांपैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. यानंतर हैदराबाद संघ आठव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर घसरला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ दहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद संघाकडे सहा तर दिल्ली संघाकडे चार गुण आहेत.

Also Read  Yashasvi Jaiswal IPL 2023 :कधीकाळी मुंबईत पाणीपुरी विकली, आता आयपीएलमध्ये झळकावले शतक

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

2 thoughts on “IPL Points Table 2023 : बंगळुरूकडून लखनौचा 18 धावांनी पराभव, आयपीएल पॉईंट्स टेबलची स्थिती काय?”

  1. Pingback: तुम्ही क्रिकेट खेळता पण 'Cricket' या शब्दाचा फुल फॉर्म माहिती आहे का? - आपला अभ्यास- Aplaabhyas

  2. Pingback: Loan App Ban : नियम न पाळल्यानं पर्सनल लोन देणाऱ्या साडे तीन हजार ॲप्सवर गुगलकडून बंदी - आपला अभ्यास- Aplaabhyas

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?