IPL 2023 Orange Cap and Purple Cap :डु प्लेसिस ऑरेंज कॅपच्या शर्यतीत  अव्वल, मोहम्मद शमीचा पर्पल कॅपवर कब्ज: टॉप 5 खेळाडूंची यादी

IPL 2023 Orange Cap and Purple Cap :डु प्लेसिस ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल, मोहम्मद शमीचा पर्पल कॅपवर कब्ज: टॉप 5 खेळाडूंची यादी

Rate this post

IPL 2023 Orange Cap and Purple Cap : आयपीएल (IPL 2023) ऑरेंज कॅपच्या (Orange Cap) शर्यतीला फार रंजक वळण आलं आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत पहिल्या स्थानावर पुन्हा एकदा आरसीबीच्या फाफ डु प्लेसिसने कब्जा केला आहे. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वालने दमदार शतकी खेळी करत ऑरेंज कॅपच्या  फाफ डू प्लेसिसला मागे टाकून ऑरेंज कॅप घेतली होती. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार डु प्लेसिसने त्याला मागे टाकत पुन्हा एकदा ऑरेंज कॅप हिसकावून घेतली आहे.

IPL 2023 Orange Cap : ऑरेंज कॅप

ऑरेंज कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या फाफ डु प्लेसिसने आतापर्यंतच्या नऊ सामन्यांमध्ये 466 धावा केल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर यशस्वी जैस्वाल आहे. त्याने नऊ सामन्यांमध्ये 428 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज डेवॉन कॉनवे तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने आतापर्यंतच्या 10 सामन्यांमध्ये 414 धावा केल्या आहेत. विराट कोहली ऑरेंज कॅपच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत नऊ सामन्यांमध्ये 364 धावा केल्या आहेत. चेन्नईचा ऋतुराज गायकवाड पाचव्या क्रमांकावर असून त्याने 10 सामन्यांमध्ये 354 धावा केल्या आहेत.

क्र.  टॉप 5 फलंदाज  धावा
1. फाफ डु प्लेसिस 466
2. यशस्वी जैस्वाल 428
3. डेवॉन कॉनवे 414
4. विराट कोहली 364
5. ऋतुराज गायकवाड 354
Also Read  India Digital Transformation: मंत्री अश्विनी वैष्णव अन् Google CEO सुंदर पिचाई यांची भेट; डिजिटल ट्रांसफॉरमेशनवर चर्चा

IPL 2023 Purple Cap :  पर्पल कॅप

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यंदाच्या आयपीएल (IPL 2023) मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सध्या मोहम्मद शमी अव्वल स्थानावर आहे. सध्याच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांत एकूण 17 विकेट्स घेत मोहम्मद शमी (Mohammed Shami) पर्पल कॅपच्या (Purple Cap) शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेनेही 17 विकेट घेतल्या. तुषारने 10 सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत.

क्र.  टॉप 5 गोलंदाज  विकेट
1. मोहम्मद शमी 17
2. तुषार देशपांडे 17
3. अर्शदीप सिंह 16
4. मोहम्मद सिराज 15
5. पियुष चावला 15
Also Read  तुम्ही क्रिकेट खेळता पण 'Cricket' या शब्दाचा फुल फॉर्म माहिती आहे का?

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IPL 2023 Points Table : कोलकाताचा हैदराबादवर पाच धावांनी विजय, गुणतालिकेत तुमचा आवडता संघ कोणत्या स्थानावर? पाहा

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

Also Read  पाणी टंचाई! राज्यातील 274 गावं-वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा, कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?