IPL 2023 : चीअर लीडर्सची कमाई ऐकाल तर हैराण व्हाल, सेलिब्रेटीही मागे पडतील 

IPL 2023 : चीअर लीडर्सची कमाई ऐकाल तर हैराण व्हाल, सेलिब्रेटीही मागे पडतील 

Rate this post

IPL 2023 Cheerleaders Income : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला दिमाखात सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून आयपीएलची नेहमीच चर्चा असते. खेळाडूंवर येथे कोट्यवधींची बोली लागते. त्यामुळे जगभरातील क्रिकेटपटू येथे आपले नशीब अजमावतात… जगभरातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपासून ते स्पॉन्सर्स आणि फ्रेंचायझी म्हणून मोठमोठाले उद्योगपती या लीगशी संबंधित आहेत. मागील दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा मोजक्याच मैदानावर खेळवली होती, आता ही स्पर्धा मूळ रुपात सुरु झाली आहे. त्यासोबतच प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या चीअरलीडर्सही आयपीएलमध्ये परतल्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की त्यांना प्रत्येक सामन्यात किती पैसे मिळतात? जाणून घ्या.

Also Read  ChatGPT:च्या सीईओ सॅम अल्टमॅन यांच्या सहमतीसह, कृत्रिम बुद्धीमत्तेच्या तंत्रज्ञानाने जगातील चिंतेची वाढ आहे.

आयपीएलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या काही चीअरलीडर्स या भारतीय आहेत, पण बहुतांश चीअरलीडर्स या परदेशी आहेत. या चीअरलीडर्सचा पगार किती… एका दिवसात त्या किती कमवतात… याबद्दल तुम्हाला माहितेय का? पाहूयात त्याबद्दल…  मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी 12 ते 20 हजार रुपये दिले जातात. त्याशिवाय त्यांच्या कामगिरीनुसार बोनसही दिला जाते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएलसाठी चीअर लीडर्सबरोबर करार केला जातो. हा करार संपूर्ण स्पर्धेसाठीचा असतो.  आयपीएलच्या प्रत्येक सामन्यानुसार चीअर लीडर्सला सरासरी 12 ते 20 हजार रुपयांचे मानधन दिले जाते. चेन्नई, पंजाब, हैदराबाद, दिल्ली या संघाकडून चीअरलीडर्सला प्रत्येक सामन्यागणिक 12 हजार रुपये दिले जातात. राजस्थानकडून 14 ते 15 हजार रुपये दिले जातात.  तर मुंबई आणि आरसीबी या संघाकडून प्रत्येक सामन्यानंतर 20 हजार रुपये दिले जाते. केकेआर संघाकडून सर्वाधिक 24 हजार रुपये प्रत्येक सामन्यानंतर दिले जातात.

Also Read  Gold Price Hike: जळगावात सोन्याचे दर पुन्हा विक्रमी पातळीवर; गेल्या 24 तासात 1000 रुपयांची वाढ

याचाही लाभ 

प्रत्येक सामन्याशिवाय चीअरलीडर्सला इतर मानधनही दिले जाते. हे मानधन त्यांच्या कामगिरीच्या आधारवर असते. एखादा संघ जिंकला तर त्यांना बोनस दिला जातो. त्याशिवाय चैनीच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ इत्यादींचा लाभ फ्रेंचायझीकडून मिळतो. एखादा संघ फायनलपर्यंत पोहोचला वेगळा बोनस दिला जातो. मॅच झाल्यानंतर किंवा त्याच्या आधी होणाऱ्या पार्टीमध्ये गेल्यास त्यांना अधिक कमाई करता येते.

Also Read  Dabur Honey Sundarbans-500gm: 100% Pure Wild Forest Honey | Raw, Unprocessed | Naturally rich in Antioxidants

निवड कशी होते ?

आयपीएलमध्ये चीअर लीडर्सचे काम अथवा नोकरी सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. आयपीएल चीअरलीडरला डान्स, मॉडेलिंग आणि गर्दीसमोर परफॉर्म करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याशिवाय चीअर लीडर्सला आपले शरीर लवचीक ठेवावे लागते. फक्त डान्स करून चालत नाही तर संघातील खेळाडूंना, चाहत्यांना प्रोत्साहन कसे देता येईल, याचा विचारही त्यांना करावा लागतो.

आणखी वाचा :

आयपीएलमध्ये पंचांना प्रत्येक सामन्याचे किती मानधन मिळते? रक्कम वाचून थक्क व्हाल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?