iPhone 15 Pro Max : अॅपल कंपनीचा जनरेशन नेक्स्ट आयफोन सीरिज याच वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनी याच वर्षी सप्टेंबर महिन्यात iPhone 15 Series बाजारात आणू शकते. मोबाईल बाजारात iPhone 15 series बाबत वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. त्यात अनेकांनी हा दावा केला आहे.
नवीन सीरिजमध्ये आणल्या जाणार्या डिव्हाईसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबाबत तज्ञही वेगवेगळे दावे करत आहेत. या एपिसोडमध्ये, iPhone 15 Pro Max बाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.
iPhone 15 Pro Max चा डिस्प्ले स्पेसिफिकेशन
iPhone 15 Pro Max बाबत समोर आलेल्या नव्या वृत्तात, डिव्हाइस डिस्प्ले स्पेफिकेशनची माहिती समोर आली आहे. या वृत्तांनुसार, अॅपलचे नवीन डिव्हाइस iPhone 15 Pro Max हा पातळ बेजल्ससह लाँच होऊ शकतो.
iPhone 14 Pro Max च्या तुलनेत पातळ बेजेल्ससह iPhone 15 Pro Max बाजारात लाँच होऊ शकतो. iPhone 15 Pro Max चा फोटोही समोर आला आहे. या फोटोत डिव्हाइसचा पातळ बेजेल्स दिसून येत आहे.
समोर आला नवीन लूक
Ice Universe हे युजर नाव असलेल्या प्रसिद्ध टिप्स्टरने iPhone 15 Pro Max चा एक फोटो शेअर केला आहे. ट्वीटरवर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये iPhone 15 Pro Max चा फ्रंट लूक समोर आला आहे. याच वर्षी लाँच झालेल्या iPhone 14 Pro Max देखील स्लिम बेजल्ससह लाँच करण्यात आला होता. थिनर बेजल्ससह युजर्सला चांगला अनुभव देण्यासाठी iPhone 14 Pro Max 2.17mm आकाराच्या बेजल्ससह लाँच झाला होता.
iPhone 15 Pro Max is destined to be a super flagship. pic.twitter.com/9mO9V7MkNb
— Ice universe (@UniverseIce) May 7, 2023
ट्रेडिशनल टू बटन डिझाइनमध्ये बदल होणार?
अॅपलच्या आगामी टॉप व्हेरिएंटमध्ये 2.17mm आकाराचा बेजल्स असू शकतो. तर, दुसरीकडे, iPhone 15 Pro Max हा कर्व्ह डिझाइनसह युजर्सला आकर्षित करू शकतो.आयफोन 15 प्रो मॅक्स आणि आयफोन 15 प्रो मोठ्या 48MP कॅमेरासह येण्याची अपेक्षा आहे. प्रो मॉडेल्समध्ये टायटॅनियम फ्रेम असू शकते
त्याशिवाय, अॅपल लाँच करत असलेल्या या नव्या डिव्हाइसमध्ये ट्रेडिशनल टू बटन डिझाइनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करणार नाही. अॅपल कंपनीने आतापर्यंत iPhone 15 Pro Max या नव्या डिव्हाइसबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
Check Your Internet speed Check Now