iPhone 15 ची निर्मिती भारतात होणार, आयफोन 14 पेक्षा स्वस्त दरात मिळणार?

iPhone 15 ची निर्मिती भारतात होणार, आयफोन 14 पेक्षा स्वस्त दरात मिळणार?

Rate this post

iPhone 15 : मोबाईल फोन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमधील आघाडीचा ब्रॅण्ड असलेल्या अॅपलने (Apple) भारतात लवकर रिटेल स्टोअर सुरु करणार असल्याचं जाहीर केलं. अशात आता अॅपल त्यांच्या अपकमिंग iPhone 15 मॉडलची  निर्मिती भारतात करणार असल्याचे समोर आले आहे. याआधीपासूनच भारतात अॅपलकडून iPhones आणि  AirPods तयार केले जात आहेत. अॅपल आता डिव्हाईसच्या लॉन्चच्या वेळी भारतात iPhone 15 मॉडेल शिप करण्याच्या तयारी करत आहे. अॅपल हे पहिल्यांदाच करणार आहे. परंतु अॅपलच्या या निर्णयामुळे भारतीय युझर्ससाठी आयफोन 15 च्या किमती कमी होतील का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Also Read  IPL 2023 GT vs DC Match Preview :दिल्ली विजयी मार्गावर परतणार की गुजरात वरचढ ठरणार? पाहा हेड टू हेड आकडेवारीमध्ये कुणाचं पारड जड

भारतात iPhone 15 च्या  प्रॉडक्शनला सुरुवात 

  1. अॅपलने भारतात त्यांचे प्रॉडक्शन वाढवायला हळूहळू सुरुवात केली आहे. आयफोनच्या निर्मितीसाठी अॅपल चीनवर अवलंबून होतं. परंतु अॅपलला आता चीनमधील उत्पादन पूर्णपणे कमी करायचं आहे. अशातच अॅपलने देशातील लोकल सप्लायर्सची मदतही घ्यायला सुरुवात केली आहे. यामध्ये Jabil
    सारख्या लोकल सप्लार्सचे नाव समोर येत आहे. या सप्लार्सच्या साहाय्याने अॅपल कंपनीने भारतात iPhone 15 मॉडेलच्या मॅन्युफॅक्चुरिंगला सुरुवात केली आहे. दुसरीकडे  iPhone 15 प्लस,  iPhone 15 प्रो,    iPhone 15 प्रो मॅक्स यासह इतर मॉडेल्सचे प्रॉडक्शन फक्त चीनमध्येच केले जाणार आहे. तसेच भविष्यात कंपनीने अॅपल पेन्सिलची निर्मिती करण्याची तयारी करत आहे. सध्या भारतातील पहिले अॅपल रिटेल स्टोअर मुंबईतील बीकेसी इथे ओपन होणार असल्याचे समजतं.
Also Read  आजपासून मुंबईत अॅपलचं स्टोअर सुरू, देशातील पहिलं अधिकृत स्टोअर

मॅन्युफॅक्चुरिंगमुळे iPhone स्वस्तात मिळणार का?

आता आयफोन 15 ची निर्मिती भारतात होत असल्याने अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की हे डिव्हाईस आयफोन 14 पेक्षा स्वस्त असेल का? iPhone 14 सध्या Apple Store वर 79,990 रुपयांना विकला जात आहे? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याआधी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की अॅपल गेल्या काही काळापासून भारतात आयफोनचे उत्पादन करत आहे, परंतु कंपनीने कधीही फोनची किंमत कमी केलेली नाही. त्यामुळे त्यांचा अपकमिंग आयफोन 15 ही कमी किमतीत उपलब्ध होईल, अशी आशा करुन काही उपयोग होणार नाही. त्यामुळे इथे आयफोन स्वतात मिळेल म्हणून आशा बाळगणाऱ्या युझर्सची थोडी निराशा होणार आहे.

Also Read  Mumbai police:मुंबई पोलीस भरती 2021 अंतर्गत लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी

iPhone 15 लॉन्चिंगला सहा महिन्यांचा अवधी

अॅपलने सध्या भारतात मॅन्युफॅक्चुरिंगला सुरुवात केली आहे. त्यामुळे कदाचित भविष्यात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विविध ऑफरच्या माध्यमातून किमतीत काही प्रमाणात सूट मिळू शकते. सध्या तरी iPhone 15 च्या लॉन्चिंगला जवळपास सहा महिन्यांचा अवधी बाकी आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात युजर्ससाठी आयफोन 15 सीरिज उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे अॅपलकडून नवीन अपडेट्स येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

हेही वाचा

New Jobs In Phone Manufacturing : केंद्र सरकारच्या पीएलआय योजनांमुळे स्मार्टफोन निर्मितीमधून दीड लाखांवर नोकऱ्यांची 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?