Apple Offline store: जगातील आघाडीची बहुराष्ट्रीय कंपनी अॅपलकडून अलीकडेच काही दिवसापूर्वी मुंबई आणि दिल्ली या शहरात अधिकृत रिटेल स्टोअर सुरू करण्यात आली आहेत. यामुळे लोकांना आयफोन (iphon14) स्वस्त किंमतीत उपलब्ध होणार, अशी चर्चा केली जात आहे. आयफोन अॅपल स्टोअरमधून खरेदी करायला हवं की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून ऑर्डर द्यायला हवी? याशिवाय अॅपलचे इतर वस्तू कोणत्या प्लॅटफॉर्मवरून स्वस्त दरात उपलब्ध
आहेत. हे सविस्तर जाणून घेऊया…
कुठून खरेदी करायला हवं?
तुम्ही अॅपल रिटेल स्टोअरमधून iphon14 विकत घेण्याचा विचार करत आहात का? तर मग या खरेदीला जरा ब्रेक द्या. कारण अॅपलच्या स्टोअरपेक्षा सर्वात जास्त सूट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट ई-कॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध आहे. सध्या अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि क्रोमा यासारख्या ई-कॉमर्स प्लटफॉर्मवरून iphon14 चं व्हर्जन 71, 999 रूपये इतक्या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे. या फोनची मूळ किमत 79,990 रूपये इतकी असल्याचं सांगण्यात येतं. तसेच एचडीएफसी बॅंकच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून आयफोन खरेदी केला तर 4,000 रूपये इतकी सूट आहे. पण ही सूट वरील तिनही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खरेदी केल्यानंतर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तसेच फ्लिपकार्टवर 29, 250 आणि 3000 रूपयांची एक्सचेंज ऑफर सुरू आहे. ही ऑफर काही मोजक्या आयफोन मॉडल्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. अॅपलच्या ग्राहकांसाठी आणखीन खुशबर आहे. अॅमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर 22,700 रूपयांची सुट उपलब्ध आहे. यासोबत क्रोमावरही सुट दिली जात आहे. त्यामुळे स्टोअरमधून फोन खरेदी करण्यापेक्षा फ्लिपकार्टवरून खरेदी करणे जास्त फायदेशीर ठरू शकतं. यासोबत एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ घेतला तर जवळपास 80-90 टक्के फायदा मिळू शकतं. अशा फोन एक्सचेंजची ऑफर ऑफलाईनही सुरू असते. पण सध्या तरी फ्लिपकार्टवर खरेदी केली तर ग्राहकांसाठी बंपर सूट देण्यात येतं आहे.
आयफोन खरेदी करण्याआधी हे लक्षात घ्या
ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून एचडीएफसी बॅंकेच्या कार्डने एक्सचेंज ऑफरसह खरेदी केल्यानंतर iphon14 ग्राहकांना खूप स्वस्त मिळणार आहे. पण ही ऑफर फक्त मोजक्या आयफोन मॉडल्सवर उपलब्ध करून दिली आहे. या बंपर सुटचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवरून खरेदी केली तर बरेच पैसे बचत होऊ शकतात. अर्थात, ही सूट रिटेल स्टोअर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी वेगवेगळी असल्याचं दिसून येतं.