Ice Cream Side Effects :कडक उन्हाळा आहे म्हणून आईस्क्रीम खात असाल, तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो

Ice Cream Side Effects :कडक उन्हाळा आहे म्हणून आईस्क्रीम खात असाल, तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो

Rate this post

Ice Cream Side Effects : सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. देशात बहुतांश भागातील तापमानाचा पारा चाळीशी पार गेला आहे. त्यामुळे उष्णतेचा अनेकांना त्रास होतो. तुमच्या शरीरातील तापमानही वाढायला लागतं आणि शरीर डिहायड्रेट व्हायला लागतं. यामुळे जीवाला गारवा मिळावा म्हणून थंडगार पाणी पितात आणि काही लोकं तर भरपूर आईस्क्रीम खातात. तसेच अनेकांना कोल्डड्रिंक्स प्यायला आवडतं. पण तुम्ही उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत म्हणून प्रमाणाबाहेर आईस्क्रीम खात असाल, तर यामुळे तुमच्या आरोग्यावर दुष्परिणाम (Ice Cream Side Effects ) होऊन मोठे नुकसानही होऊ शकते. हे दुष्परिणाम कोणते ते आपण जाणून घेऊया…

Also Read  Health Tips दम्याची लक्षणं जाणवतायत? काळजी करू नका; 'हे' उपचार जाणून घ्या

लठ्ठपणा वाढतो

तुम्हाला जर भरपूर आईस्क्रीम खायची सवय असेल, तर लठ्ठपणा वाढू शकतो. आईस्क्रीमध्ये शुगर आणि कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे शरीरातील फॅट वाढू शकतं. यामुळे वजन वाढतं आणि अनेक आजारांना फुकटचं निमंत्रण मिळू शकतं. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांना दिवसभरात 3 ते 4 आईस्क्रीम खायची सवय आहे त्यांच्या शरीरात 1 हजार पेक्षा जास्त कॅलरीज जातात. हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.

ह्रदयविकाराचा धोका

आईस्क्रीमध्ये फॅट भरपूर प्रमाण असतं. त्यामुळे शरीरातील ट्रायग्लिसराईड्स आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. यामुळे वजन वाढतं आणि लठ्ठपणाचीही समस्या निर्माण होते. तसेच ह्रदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. तुम्ही जर हाय ब्लड प्रेशरचे रुग्ण असाल, तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. परंतु, बहुतांश लोकांना आईस्क्रीम  खायाल आवडतं.

Also Read  class 10 cbse result 2023 date:

मेंदूवर होऊ शकतो परिणाम

आईस्क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि शुगरचं प्रमाण भरपूर असतं. याच्या अतिसेवनामुळे मेंदूवर परिणाम होतो. स्मरणशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो आईस्क्रीम कमी खाण्याचा प्रयत्न करा. याविषयी अनेक संशोधनात्मक अभ्यासही करण्यात आले आहेत. सॅच्युरेटेड फॅट असलेल्या पदार्थांमध्ये बिस्कीट, तूप, पनीर आणि क्रिम्स यासारख्या फूडचा समावेश असतो.

मधुमेही रुग्णांनी आईस्क्रीमपासून दूरच राहा

ज्यांना मधुमेहाचा आजार जडला आहे त्यांनी आईस्क्रीम खाणं टाळायला हवं. ज्यांना अनुवांशिक आजार आहेत त्यांनी आईस्क्रीम खाण्यापासून दूर राहायला हवं. अन्यथा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. कारण आईस्क्रीममध्ये भरपूर शुगर असतं. सोबत फॅटचं प्रमाणही जास्त असतं.

Also Read  'ट्विटर व्हेरिफाईड'कडून सर्व व्हेरिफाईड अकाऊंट्स अनफॉलो; सोशल मीडियावर खळबळ

(Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ वाचकांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.)

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज  

 

2 thoughts on “Ice Cream Side Effects :कडक उन्हाळा आहे म्हणून आईस्क्रीम खात असाल, तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो”

  1. Pingback: TCS Jobs: टीसीएसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगारवाढीसोबतच नोकर भरतीची देखील घोषणा - आपला अभ्

  2. Pingback: सावधान! उन्हाळ्यात AC शिवाय झोप लागत नाही? आरोग्यासाठी ठरतं घातक - आपला अभ्यास- Aplaabhyas

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?