How Many Eggs Should I Eat A Day:दररोज अंडी खाण्यामुळे होणारे फायदे?

How Many Eggs Should I Eat A Day:दररोज अंडी खाण्यामुळे होणारे फायदे?

Rate this post

How Many Eggs Should I Eat A Day: आपण लहानपणापासून नेहमी ऐकत आलो आहोत की, दररोज अंड्याचं सेवन (Eating egg) करणं आरोग्यासाठी चांगलं असतं. टीव्हीवरील जाहिरातीतूनही संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे असा संदेश दिला जातो. यातून अंड्याचं आरोग्यविषयक महत्त्व दिसून येतं. जगातील बहुतांश लोकांना ब्रेकफास्टमध्ये अंडी खायला आवडतं. शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी अनेकजण अंडी खातात.  याचा अर्थ, अंडे खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे शरीरातील स्नायूंच्या वाढीसाठी आणि अनेक आजारापांसून स्वत:चा बचाव करण्यासाठी अंडी खाणं चांगलं असतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, एक दिवसात नेमकी किती अंडी खाणं योग्य आहे?  दररोज अंडी खाणं व्यक्तीसाठी चांगलं आहे का?  या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊया…

Also Read  Bageshwar dham: होटल मे धीरेंद्र शास्त्री के ठहरने के लिए कितना पैसा वसूला? आप अपने रसोईया के हाथ से बना हुआ खाना खाएंगे।

एका दिवसात किती अंडी खाणं योग्य?

हेल्दी व्यक्तीने दररोज दोन ते तीन अंडी आणि एका आठवड्यातून 7 ते 10 अंडी खाणं चांगलं असतं. तसेच खेळाडू, धावपटू किंवा जे नियमितपणे शारीरिक कसरत करता अशा लोकांना प्रोटिन अधिक आवश्यकता असते. अशा व्यक्तींनी दररोज चार ते पाच अंडी खाणं चांगलं असतं. ज्यांना नियमितपणे अंडी खायची सवय आहे त्यांनी अंड्याचा पांढरा भागच खायला हवं. याशिवाय ज्यांना हृदय विकाराचा आजार आहे, ते  एका दिवसात एक ते दोन अंडी खाऊ शकतात. पण त्यापेक्षा जास्त अंडी खाणं टाळायलं हवं. अंड्यामुळे गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत मिळते. पण ज्यांना आधीच कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी अंडी खाणं कमी करायल हवं. यासाठी संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. त्याशिवाय अतिरिक्त अंड्याचं सेवन करू नये.

Also Read  तुमचं मुलं नैराश्यात तर नाही ना? नैराश्य म्हणजे नेमकं काय? लक्षणे आणि उपाय

अंडी खाण्यामुळे होणारे फायदे?

1. दररोज एक ते दोन अंडी खाल्यामुळेही शरीराला चांगलं प्रोटीन मिळू शकतं.
2. तुमची त्वचा आणि नखांच्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
3. तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत मिळते.
4. डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं.
5. व्यक्तीची स्मरणशक्तीमध्ये सुधारणा होते.
6. अंड्यात कॅलशियम असल्यामुळे हडे मजबूत राहतात.
7. स्नायूंना मजबूतीसाठी अंडी खायला हवीत.
8. हृदयांच्या आरोग्यासाठी खूपच चांगलं असतं.

फक्त या गोष्टींची घ्या काळजी घ्या

जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा आजार असले, तर अंडी खाणं टाळायल हवं. पण तुम्ही अंड्यातील पिवळा भाग काढून वरील पांढरा भाग खात असाल, तर चांगलं आहे. यामुळे आरोग्याचं नुकसान होण्याची शक्यता कमी असते. कारण यातील पिवळ्या भागात फॅट जास्त असतं. यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना धोक्याचं ठरू शकतं. जे मधुमेही रूग्ण आहेत त्यांनी वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतरच आहारा अंड्याचा समावेश करायला हवा. तसेच आवश्यकते पेक्षा जास्त अंडी खाणं आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नसतं. कारण यामुळे शरीरातील गर्मीचं प्रमाण वाढतं. यामुळे पोट खराब होण्याची शक्यता असते.

Also Read  RBI बैठक: ईएमआय कमी होण्याची शक्यता?

(Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ वाचकांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. )

इतर महत्वाच्या बातम्या

उपयुक्त वेब स्टोरीज  

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

1 thought on “How Many Eggs Should I Eat A Day:दररोज अंडी खाण्यामुळे होणारे फायदे?”

  1. Pingback: Team India Captaincy Virat Kohli vs Rohit Sharma:कोहलीकडे पुन्हा टीम इंडियाची कमान? रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; रोहित शर्मा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?