Health Tips:दुपारी झोपण्याची सवय ठरू शकते घातक! जाणून घ्या का ते?

Health Tips:दुपारी झोपण्याची सवय ठरू शकते घातक! जाणून घ्या का ते?

Rate this post

Health Tips : बहुतांश लोकांना दुपारी झोप घ्यायला आवडतं. याला दुपारची वामकुक्षी असं बोलतात. बदलत्या लाईफस्टाईलमुळेही काही जणांना दुपारी झोपावं लागतं. पण दुपारच्या झोपेबाबत प्रत्येकाची वेगळं मत असू शकतं. यामध्ये बऱ्याच लोकांना दुपारी थोडा वेळ वामकुक्षी घेतल्यामुळे रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं. परंतु, संशोधनानुसार, दुपारी झोपल्यामुळे (Afternoon Nap) मेंदूची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि  मेटाबॉलिज्म (चयापचय प्रक्रिया) सिस्टीमवर परिणाम होतो. अलीकडे  Brigham and Women’s Hospital च्या शास्त्रज्ञांनी एक संशोधन केलं आहे. यासाठी 3 हजार 275 तरूणांचा संशोधनात समावेश करण्यात आला होता. हे संशोधन स्पेनमधील मर्सिया भागात करण्यात आले. या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की, दिवसाची झोप एकसारखी कधीच नसते. प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी झोप असते. यामध्ये किती वेळ झोप घेतली, झोपण्याची स्थिती आणि  इतर अनेक कारणे मानवी आरोग्याला (Health) परिणाम करत असतात. यामध्ये संशोधकांना असंही आढळून आलं की,  युनायटेड किंगडमच्या लोकांमध्ये दिवसा झोपल्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे  दिवसा झोपायची सवय असेल, तर आरोग्यासाठी धोक्याचं आहे.

Also Read  Health Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या 'या' गोष्टी

दिवसा झोपल्यामुळे होणारे दुष्परिणाम

संशोधनानुसार, स्पेनसारख्या देशातही दुपारी वामकुक्षी घेतल्यामुळे लोकांच्या आरोग्याचं मोठ नुकसान होतं.  या संशोधनात असं आढळून आलं आहे की, दिवसा झोप न घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत दुपाराच्या वेळी 30 मिनीटापेक्षा जास्त वेळ झोपणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाला आहे. यामध्ये त्यांच्या बॉडी मास इंडेक्स, हाय ब्लड प्रेशर ( BP) आणि  हार्ट अॅटक यासारखे आजार होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच, डायबिटीजही होण्याचा धोका अधिक असतो.

Also Read  GST Collection : संकलनाचे आजवरचे सर्व विक्रम मोडत एप्रिलमध्ये 1.87 लाख कोटींचा कर जमा

दुपारच्या डुलकीमुळे लठ्ठपणा वाढतो का?

दुपारच्या वेळी काही मिनीटे झोपल्यामुळे आरोग्याला कोणताही धोका नसल्याचं आढळून आले. दुपारी 10-15 मिनीटे झोपणाऱ्या लोकांमध्ये दुपारी कधीच न झोपणाऱ्या लोकांच्या तुलनेत ब्लड प्रेशर न वाढता नॉर्मला असल्याचं दिसून आलं. अर्थात, दुपारी थोडा वेळ झोपणं हे खरंच फायदेशीर आहे का?  यावर आणखीन संशोधन करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही दिवसा किती वेळ झोप घेता हे खूप महत्वाचं आहे, असंही या संशोधनात सांगितले आहे. दुपारच्या वामकुक्षीला पावर नॅप  (Afternoon Nap) म्हणतात. यामध्ये व्यक्ती स्वत: ला रिफ्रेश करण्यासाठी 10 ते 15  मिनीटांची झोप घेतात. यामुळे तणावमुक्त आणि एनर्जेटिक वाटतं आणि आरोग्यही चांगलं राहतं.

Also Read  Heat Anxiety पासून स्वत: ची कशी काळजी घ्याल?

(टीप : वरील सर्व बाबी आपला अभ्यास टीम  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातूनआपला अभ्यास टीम कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

Calculate your BMI Check Now

Calculate your Age Check Now

Check Your Internet speed Check Now

इतर महत्वाच्या बातम्या

 

उपयुक्त वेब स्टोरीज

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?