Health Tips :सावधान ! मलेरिया, कोरोना आणि इन्फ्लूएंझाच्या रूग्णांत एकसारखाच ताप,  दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं

Health Tips :सावधान ! मलेरिया, कोरोना आणि इन्फ्लूएंझाच्या रूग्णांत एकसारखाच ताप, दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं

Rate this post

Health Tips : साधारण गेल्या काही काळापासून कोरोनामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. या संकटातून अजूनही पूर्ण सुटका झाली नाही. अशातच व्हायरसच्या लक्षणांबाबत आणखीन एक नवीन बाब समोर आली आहे.  मलेरिया (Maleria),कोविड- 19  (Covid-19) आणि इन्फ्लूएंझा (H3N2) या तिन्ही आजारांमध्ये एक समान धागा म्हणजे ताप येणं. गेल्या अनेक वर्षापासून मलेरियाबद्दल ऐकत आलो आहोत. मलेरिया अजूनही आपल्यातच आहे. साधारण गेल्या तीन-एक वर्षापासून कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भयंकर परिणामालाही सामोरं जावं लागलं आहे. हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे. सध्या अधूनमधून कोरोनाच्या रूग्णांत वाढ झाल्याच्या बातम्या येतात. आता H3N2 व्हायरसच्या रूग्णांत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. या तिनही आजारांत ताप येणं ही एक कॉमन गोष्ट आहे. या तिन्ही आजाराच्या लक्षणांतील नेमका फरक काय?  हे आज आपण जाणून घेऊया…

Also Read  Drinking Water Before Tea तुम्हाला चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय आहे का? याबद्दल सविस्तर जाणून घ्या

मलेरिया, कोरोना, H3N2 या आजारातील नेमका फरक काय?

या आजारांच्या ट्रान्समिशन मोडमधील असणारा फरक

कोरोना आणि H3N2 व्हायरसपेक्षा मलेरिया आजार थोडा वेगळा आहे. मलेरियाची एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला लागण होत नाही. मलेरिया एक मादी डास चावल्यामुळे होतो आणि पसरतो. परंतु कोरोना एका माणसांकडून दुसऱ्या माणसांच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना संसर्गजन्य आजारात मोडतो. तसेच इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये ( H3N2) श्वसनामुळे होणारा आजार आहे. यामध्ये रुग्ण शिंकल्यानंतर व्हायरस हवेत पसरतो. तसं पाहिलं तर तिन्ही आजारातील लक्षणं वरवर एकसारखी दिसतात. परंतु त्यांच्यात बराच फरक आहे.

लक्षणांवरून आजारातील फरक?

साधारपणे मलेरिया, कोरोना, इन्फ्लूएंझा व्हायरस -H3N2 च्या आजारात व्यक्तीला डोकं दुखणं, अंग दुखणं आणि ताप यासारखी लक्षणं दिसून येतात. पण मलेरियामध्ये थंडी-ताप, उलटी येणं, मळमळ, डोकं दुखणं आणि स्नायू दुखणं यासारखी लक्षणं दिसून येतात. कोरोनाची लागण झाल्यानंतर श्वास घेण्यासाठी त्रास होतो, चालताना दम लागतो आणि वास घेण्याची क्षमता संपलेली असते.

Also Read  Buying Pottery:मातीची भांडी किंवा मडके विकत घेण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?

किती दिवसांत समजतात आजारांची लक्षणं ?

व्यक्तीला मलेरिया झाल्यानंतर एक आठवड्यापासून ते अनेक महिन्यापर्यंत मलेरिया शरीरात असूनही लवकर डिटेक्ट होत नाही. अनेक महिने व्यक्ती आजारी असते. परंतु कोरोनात 5 ते 6 दिवसांत लक्षणं दिसून येतात. बऱ्याच वेळा  2 ते 15 दिवसानंतर लक्षणं दिसायला लागतात. तसेच इन्फ्लूएंझा व्हायरसची (H3N2) लक्षणं एक ते 4  दिवसांत समजून येतात.

आजाराच्या तपासणीत असणारा फरक

मलेरियाच्या आजाराची ओळख करण्यासाठी ब्लड टेस्ट केली जाते. तर इन्फ्लूएंझा व्हायरसमध्ये अॅंटिजन टेस्ट केली जाते आणि  कोरोन व्हायरसला ओळखण्यासाठी RT-PCR टेस्ट केली जाते. या टेस्टमुळे कोरोनाचा संसर्ग झाला किंवा नाही ते ओळखण्यास मदत मिळते.

Also Read  Faceebok Update:आणि Instagram वर आलं एक भन्नाट फिचर, आता प्रोफाईल आणखीन आकर्षक दिसणार

उपचार पद्धतीत असणारा फरक

मलेरिया, करोना आणि इन्फ्लूएंझा व्हायरस यांच्या उपचार पद्धतीत फरक आहे. कोरोनापासून स्वत: चा बचाव करण्यासाठी लसीकरण केलं जातं. सोबत काही औषधही दिली जातात. इन्फ्लूएंजा व्हायरसची लागण झाल्यानंतर अॅंटीव्हायरल औषध दिली जातात. तसेच यामध्ये स्वच्छतेची काळजी घ्यायला सांगितली जाते. तर मलेरियामध्ये औषध दिली जातात. अर्थात, हे सर्व  डॉक्टरांच्या सल्ल्यावरूनच उपचार केले जातात. हे लक्षात घेणं आवश्यक आहे.

(Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ वाचकांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

5 thoughts on “Health Tips :सावधान ! मलेरिया, कोरोना आणि इन्फ्लूएंझाच्या रूग्णांत एकसारखाच ताप, दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं”

  1. Pingback: Nagpur NCI Inauguration :मोहन भागवतांच्या हस्ते नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं लोकार्पण,फडणवीसांसह

  2. Pingback: देशात सर्वात स्वस्त, महाग पेट्रोल-डिझेल कुठे मिळतंय? पाहा आजचे दर - आपला अभ्यास- Aplaabhyas

  3. Pingback: Market Committee Election:छत्रपती संभाजीनगरमधील बाजार समितीच्या मतमोजणीला सुरुवात; पाहा कुठे काय परिस्थिती - आप

  4. Pingback: IPL 2023 : विजय शंकरचा 'तांडव', गुजरातचा कोलकात्यावर सात विकेटने विजय - आपला अभ्यास- Aplaabhyas

  5. Pingback: Health Tips:दुपारी झोपण्याची सवय ठरू शकते घातक! जाणून घ्या का ते? - आपला अभ्यास- Aplaabhyas

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?