Health Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Health Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या ‘या’ गोष्टी

Rate this post


Successful weight loss : वजन कमी (Weight Loss tips) करण्यासाठी हल्ली लोक अनेक उपाय करत असतात. व्यायाम करतात, झोपेच्या वेळा ठरवतात, खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. तरी देखील हवं तेवढे वजन कमी होत नाही. पण योग्य प्रमाणातील वजन आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. जास्त वजन असलेल्या लोकांना अनेक आजारांचा देखील सामना करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा नाही. आपण रोजच्या जीवनशैलीत काय खात असतो हे देखील खूप महत्वाचे आहे. वजन कमी असावे असं प्रत्येकाला वाटतं असते, पण वजन कमी करण्यासाठी रोजच्या जेवणातील भात की चपाती (Rice or Chapati) आरोग्यासाठी उत्तम आहे? चला मग जाणून घेऊया नेमकं कोणत्या पदार्थामुळे वजन कमी होऊ शकते… 

Also Read  Potato Paneer Shots Recipe:लहान मुलांसाठी स्नॅक्समध्ये बनवा पोटॅटो पनीर शॉट्स; कमीत कमी वेळात बनवा खुसखुशीत डिश

भात की चपाती योग्य? 

अनेकांना भात नाही खाल्ला तर जेवल्यासारखे वाटत नाही. पण भात आणि चपाती हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी उत्तम असतात. भातापेक्षा चपातीत जास्त पोषण असते. त्याचबरोबर भात खाल्ल्याने रक्तातील साखर लवकर वाढते. पण चपाती खाल्ल्यानंतर वाढत नाही. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी चपाती हा उत्तम पर्याय आहे. तसेच चपाती खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक कमी लागते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पण ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांना भात खाण्याचा सल्ला दिला जातो.  

वाचा : मुंबईतील 10 स्ट्रीट फूड ठिकाणे, पाहता क्षणी तोंडाला येईल पाणी…

Also Read  Excessive Use Of Garlic:तुम्ही भाजीत जास्त प्रमाणात लसूण वापरताय? आरोग्यावर होईल 'असा' परिणाम

वजन कमी करण्यासाठी चपाती उत्तम

भाताच्या तुलनेत चपातीत प्रथिने आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पचनक्रिया अधिक मजबूत होते. चपाती खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. त्यामुळे आपण जास्त खाणे टाळतो. जर तुम्हाला पण वजन कमी करायचे असेल तर त्यांना चपाती खाण्याचा सल्ला दिला जातो. 

साधारण: गव्हाच्या पिठाचा वापर करून बनवलेली ब्रेड ही प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि विविध जीवनसत्त्वे यांचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही चपाती प्रमाणात खाल्ले तर तुमचे वजन वाढत नाही. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर जास्त प्रमाणात चपाती खाऊ नका. 

Also Read  कमकुवत प्रतिकारशक्तीची 5 लक्षणे, वेळीच लक्षात घ्या, अन्यथा...

वजन कमी करण्यासाठी अशी चपाती खा…

संपूर्ण गव्हाच्या पिठाच्या चपातीमध्ये भरपूर फायबर असते. ज्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत करू शकतो. पण तरीही तुम्हाला याबद्दल शंका असेल  तर तुम्ही गव्हाच्या पिठात संपूर्ण धान्यांची जोड देऊ शकता. मल्टीग्रेन चपाती म्हणून देखील तयार केले जाऊ शकते. चपाती हेल्दी बनवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे नाचणी, बाजरी, ज्वारी यांसारख्या उच्च फायबरच्या पीठांनी तयार करा म्हणजे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल.  

 

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.) 



Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?