Hair Care Tips: महिलांनी उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

Hair Care Tips: महिलांनी उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?

Rate this post

Hair Wash in a week: सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत त्यामुळे आपल्याला आता आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून आपल्या केसांचीही (Hair Tips in Summer) काळजी घेणे आपल्यासाठी बंधनकारक आहे. अनेकांना केसात येणाऱ्या घामाचा आणि स्कॅल्प ऑईलचा (Scalp Oil in Hair) त्रास असतो. त्यामुळे केसात कोंडा आणि घाण निर्माण होयला फारसा वेळ लागत नाही. यावेळी उन्हाळ्यात तुम्ही कोणते पदार्थ खाता याकडेही लक्ष देणे आवश्यक ठरते.

तुम्ही सतत जंक फूड खात असाल तर त्याचा परिणाम तुमच्या केसांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. केस गळती, कोंडा आणि स्कॅल्प ऑईलचा त्रास या काळात अधिकच वाढू लागतो. तेव्हा हेअर वॉश करणं हे आपल्यासाठी नितांत आवश्यक असते.

आजकाल हायब्रीड स्वरूपात कामाची पद्धत असल्यानं नोकरी करणाऱ्यांना स्त्रियांना पार्लरमध्ये जाण्यासाठीही योग्य तो वेळ मिळू लागला आहे. त्यामुळे हेअर वॉश करण्यासाठीही त्या हक्काचा वेळ काढू शकत आहेत. परंतु रोज ऑफिसमध्ये जाणाऱ्या स्त्रियांना आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी फारसा (Hair Care Tips for Working Women) वेळ मिळतही नाही तेव्हा त्यांना सुट्टीच्या दिवशी वेळ काढवा लागतो आणि त्यासाठी घाईघाईत केस धुवावे लागतात. बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर स्त्रिया केस धुतात आणि त्यामुळे पार्लरमध्येही गेल्यावर हेअर एक्सपर्टकडून निदान आठवड्यातून दोनदा-तीनदा केस धुण्याचा सल्ला दिला जातो.

Also Read  उन्हाळ्याच्या काळात दही-भात खाण्याचे 'हे' आहेत फायदे, जाणून घ्या सविस्तर

महिलांना हा प्रश्न कायमच सतावतो की आठवड्यातून निदान किती वेळा केस धुणं गरजेचे आहे आणि आता उन्हाळ्यात केस किती (How many times i can wash my hairs in a week) वेळा धुतले पाहिजे. नेहमीप्रमाणे आपण जितक्या वेळा केस धुतो त्याच्यापेक्षा काही जास्त वेळा उन्हाळ्यात केस धुतले पाहिजेत असा आपलाही आग्रह असतो. परंतु या लेखातून जाणून घेऊया की उन्हाळ्यात महिलांनी किती वेळा केस धुतले पाहिजे आणि का?

Also Read  भारतातील पहिलं अॅपल स्टोअर आजपासून मुंबईत सुरु होणार

जास्त वेळा केस धुणं पडेल महागात

अनेक जण आपल्या केसांना घेऊन खूप पजेसिव्ह असतो. आपले केस जरा खराब दिसले की सारखे सारखे केस धुण्याचीही अनेकांना सवय असते. परंतु तुम्हाला ही सवय मोडणं आवश्यक आहे. कारण जास्त वेळा केस धुतल्यानं तुमच्या केसांवर त्याचा वेगळा परिणामही होऊ शकतो. त्यातून बरेच दिवस तुम्ही केस धुतलेच नसतली तर त्याचाही परिणाम तुमच्या केसांवर होयला वेळ लागत नाही. तेव्हा आपल्या याचा योग्य तो बलॅन्स ठेवणे आवश्यक राहते.

हेही वाचा  –  Right Time to Eat Egg: अंडी खाण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीये का?

Also Read  Wakeup With Headache:सकाळी झोपेतून उठल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवतोय? मग दुर्लक्ष नको, जाणून घ्या का ते?

केस किती वेळा धुतावेत

केसांची स्थिती ही दोन गोष्टींवरून ठरते एक म्हणजे ऑयली हेअर आणि ड्राय हेअर (Dry Hair). तेव्हा आपल्याला त्याप्रमाणे आपले केस किती वेळा धुतावेत याबद्दल योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. ड्राय केस असलेल्या महिला योग्य मॉश्चराईझर शॅम्पूसह आठवड्यातून तीन वेळा केस धुवू शकतात. तर ऑईल हेअर (Oily Hair) असलेल्या स्त्रियांनी निदान तीन वेळा तरी केस धुणे आवश्यक आहे. यामध्ये डॅडंड्रफ आणि कुरळे केस असलेल्या तसेच पातळ केस असलेल्या महिलांनाही आपल्या केसासाठी योग्य तो तज्ञांचा सल्ला घेऊन केस धुणं आवश्यक आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?