GST Collection : एप्रिल महिन्यात आजवरचं सर्वाधिक जीएसटी (goods and services tax) कलेक्शन झालं आहे. काल संपलेल्या एप्रिलमध्ये (GST Colletion in April 2023) तब्बल एक कोटी 87 लाख कोटी रुपयाचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून जमा करण्यात आला आहे. जीएसटी करसंकलन सुरु झाल्यापासून ही आजवरची सर्वाधिक नोंद आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे.
एप्रिल 2023 मध्ये अगदी नेमकेपणाने सांगायचं तर ₹ 1,87,035 कोटी जीएसटी जमा करण्यात आला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार यातील केंद्राचा वाटा म्हणजेच सीजीएसटी (CGST) रु. 38440 कोटी आहे तर राज्याचा वाटा म्हणजेच एसजीएसटी (SGST) रु. 47412 कोटी रुपये आहे. तर एकात्मिक जीएसटी म्हणजेच आयजीएसटी (IGST) संकलन 89158 कोटी रुपये आहे.
गेल्यावर्षी म्हणजे एप्रिल 2022 मध्ये जमा झालेल्या जीएसटीच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये जमा झालेला जीएसटी हा तब्बल 12% जास्त आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जमा झालेल्या जीएसटी महसुलापेक्षा यावर्षी एप्रिल महिन्यात जमा झालेला जीएसटी रुपये 19,495 कोटींपैक्षा जास्त आहे.
यापूर्वी सर्वाधिक जीएसटी संकलनाचा बेंचमार्क म्हणजेच आजवरचा सर्वाधिक जीएसटी संकलनाचा आकडा रुपये 1.75 लाख कोटी होता. आता 1.87 लाख कोटींचा जीएसटी गोळा करुन नवा उच्चांक स्थापित करण्यात आला आहे.
मागील महिन्यात म्हणजे मार्च 2023 मध्ये तब्बल 1.60 लाख कोटी रुपयांचा जीएसटी कर गोळा करण्यात आला होता.
एप्रिल 2023 या महिन्यात जीएसटी सुसंगत तब्बल 9 कोटी व्यवहार (E-way Bills) नोंदवण्यात आले. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये नोंदवण्यात आलेल्या 8.1 कोटी ई वे बिलांच्या तुलनेत एप्रिलमधील वाढ ही तब्बल 11 टक्के जास्त आहे.
एप्रिल महिन्यात सर्वाधिक जीएसटी सुसंगत व्यवहार 20 एप्रिल रोजी करण्यात आले, असंही केंद्र सकारने जारी केलेल्या आकडेवारीत स्पष्ट करण्यात आलं आहे. 20 एप्रिल 2023 या एकाच दिवसात 9.8 लाख व्यवहारातून तब्बल 68,228 कोटी रुपयाचा जीएसटी महसूल जमा करण्यात आला. या तारखेच्या बरोबर एक वर्षापूर्वी 20 एप्रिल 2022 रोजी 9.6 लाख व्यवहारातून 57,846 कोटी रुपयाचा जीएसटी मिळाला होता.
एप्रिल 2023 मध्ये झालेल्या व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्वाधिक जीएसटी संकलनाची नोंद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याप्रमाणे अपेक्षेनुसार एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलनाने आजवरचे जीएसटी करवसुलीचे सर्व विक्रम मोडत, नवा उच्चांक गाठला आहे.
पीआयबीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, देशात सर्वाधिक जीएसटी संकलन करुन देणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. महाराष्ट्रातून एप्रिल 2023 मध्ये 33196 कोटी रुपयाचा जीएसटी संकलित झाला आहे. गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल 2022 मध्ये हा आकडा 27495 कोटी रुपये होता. महाराष्ट्राने गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये तब्बल 21 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. महाराष्ट्रानंतर जीएसटी संकलनात दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. कर्नाटकने 14593 कोटी रुपये कर संकलित केला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर गुजरातने केलेलं जीएसटी संकलन आहे. गुजरातने एप्रिल महिन्यात 11721 कोटी रुपयाचा जीएसटी संकलित करुन दिला.
Check Your Internet speed Check Now
Pingback: Government rules change:आजपासून सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचे तीन नियम बदलणार . - आपला अभ्यास- Aplaabhyas
Pingback: Potato Paneer Shots Recipe:लहान मुलांसाठी स्नॅक्समध्ये बनवा पोटॅटो पनीर शॉट्स; कमीत कमी वेळात बनवा खुसखुशीत डिश -