महाराष्ट्र शासन
सन २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षातील सर्वसाधारण बदल्या करण्यास मुदतवाढ देणेबाबत..
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांकः बदली – २०२३/प्र.क्र.३२/कार्या १२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
शासन निर्णय :-
तारीख: ३० मे, २०२३
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतूदीनुसार राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्येक वर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या करण्यात येतात. तथापि, सन २०२३ – २४ या चालू आर्थिक वर्षातील दि. ३१ मे, २०२३ पर्यंत करावयाच्या सर्वसाधारण बदल्या या दि. ३० जून, २०२३ पर्यंत करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
या
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०५३०१६५०४३४२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
प्रत,
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
१. राज्यपालांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
३. उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
४. सर्व मंत्री/ राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. मा.विरोधी पक्षनेता, विधानपरिपद / विधानसभा, विधानभवन, मुंबई,
६.
सर्व मा. संसद सदस्य/ विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य,
७. मा.मुख्य सचिव,
८. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
९. सर्व विभागीय आयुक्त,
१०. सर्व जिल्हाधिकारी,
११.
. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१२. सर्व मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
(संबंधित प्रशासकीय विभागामार्फत )
१३. सामान्य
प्रशासन विभाग/का. ३९ (महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीकरिता),
१४. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
१५. निवड नस्ती कार्या- १२.