Google Translate मध्ये टाइप करण्याचे कष्ट वाचले. फोटोवरील मजकूराचे भाषांतर करण्यासाठी वापरा सोपी ट्रिक

Rate this post

Google Translate मध्ये झालेल्या या नव्या अपडेट्सचा फायदा वापरकर्त्यांना होणार आहे.

Google Translate ही गुगलची सेवा जगभरामध्ये वापरली जाते. यामध्ये १२० पेक्षा जास्त भाषांचा समावेश आहे. हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू अशा काही भारतीय भाषादेखील गुगल ट्रान्सलेटमध्ये आहेत. एखाद्या भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतरीत करण्यासाठी गुगलच्या या टूलचा वापर केला जातो. परदेशातील लोकांशी संवाद साधताना, एखादी अनोळखी भाषा शिकताना गुगल ट्रान्सलेटची खूप मदत होते. एप्रिल २००६ मध्ये गुगलद्वारे ही सेवा लॉन्च करण्यात आली होती. या सेवेसंबंधित महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

Also Read  gb whatsapp download, gb whatsapp काय  आहे? gb whatsapp apk download  डाउनलोड  कसे करावे ?

गुगल ट्रान्सलेटमध्ये नुकतेच अपडेट करण्यात आले आहे. या नव्या अपडेट्समुळे वापरकर्त्यांना फोटोच्या माध्यमातूनही भाषांतर करणे शक्य होणार आहे. सोप्या शब्दात, गुगल ट्रान्सलेट आता फोटो स्कॅन करुन त्यावर लिहिलेला मजकूर दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतरित करु शकणार आहे. काही दिवसांपूर्वीच हा नवा अपडेट करण्यात आला आहे.

फोटोवरील मजकूर भाषांतरित करण्यासाठी सर्वप्रथम वेबवर Google Translate ची वेबसाइटवर जावे.

होमपेजवर गुगल ट्रान्सलेट या नावाच्या खाली टेक्स असे लिहिलेले दिसेल. त्याच्या बाजूला Image पर्याय दिसतील.

Also Read  GPT-4 :The new generation of AI language model OpenAI announces  

त्यातील इमेज टॅबवर क्लिक केल्यावर jpg, jpeg किंवा png फॉरमॅटमध्ये मजकूर असलेली फोटोची फाईल अपलोड करावी. पुढे त्यामध्ये असलेले टूल फोटो स्कॅन करुन त्यातील भाषा कोणती हे शोधून काढेल आणि डीफॉल्ट म्हणून सेट केलेल्या भाषेमध्ये मजकूर भाषांतरित होईल. हा मजकूर कॉपी करता येतो, तसेच भाषांतरित मजकूराचा फोटो डाऊनलोड करता येतो.

भाषांतर केल्यानंतर दोन्ही मजकूरांमधील तुलना पाहण्याची सुविधाही यात उपलब्ध आहे. यासाठी वरच्या बाजूला असलेल्या Show original toggle या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या टूलच्या खालच्या बाजूला History असे लिहिलेले दिसते. यामध्ये भाषांतर केलेला मजकूर जतन केला असतो असे म्हटले जात आहे. आउटपुटखाली असलेल्या ‘Lens translate’ वरुन गुगल ट्रान्सलेटमधला हा नवा अपडेट गुगल लेन्ससाठी वापरण्यात येणाऱ्या GAN (generative adversarial networks) चा वापर करत असल्याचे समजते.

Also Read  freelancing: फ्रीलांसिंग साईटवरून पैसे कमवण्याच्या विविध पद्धती

धन्यवाद

यासारख्या आणखी पोस्ट बघण्यासाठी आपला अभ्यास या वेबसाईटला दररोज व्हिजिट करा आपल्याला नवनवीन टेक्नो ट्रिक्स आपला अभ्यास या वेबसाईटवर बघायला मिळतील व नवीन तंत्रज्ञान शिकायला मिळेल. धन्यवाद

1 thought on “Google Translate मध्ये टाइप करण्याचे कष्ट वाचले. फोटोवरील मजकूराचे भाषांतर करण्यासाठी वापरा सोपी ट्रिक”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?