Faceebok Update:आणि  Instagram वर आलं एक भन्नाट फिचर, आता प्रोफाईल आणखीन आकर्षक दिसणार

Faceebok Update:आणि Instagram वर आलं एक भन्नाट फिचर, आता प्रोफाईल आणखीन आकर्षक दिसणार

Rate this post

Faceebok Update: सध्या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर अनेक नवीन फिचर येत आहेत. गेल्यावर्षी  मेटानं फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठीAvatar नावाचं एक भन्नाट फिचर लाँच केलं होतं. हे फिचर फेसबुक आणि इन्स्टाग्राम यूजर्सच्या प्रचंड पसंतीस उतरलं होतं. या फिचरच्या मदतीनं लोक स्वत :ला  किंवा मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपला कार्टूनच्या अवतारात रिफ्लेट करू शकतात. विशेष म्हणजे अवतारद्वारे प्रोफाईल फोटोसोबत तुम्हाला समोरची व्यक्ती पाहू शकते. यानंतर मेटानं  Avatar स्टोर आणि व्हॉट्सअॅपच्या प्लॅटफाॅर्मवरही घोषित केलं होतं. हे नवीन फिचरही युजर्सना प्रचंड आवडत आहे. या मेटानं अवतारच्या सेक्शनमध्ये काही नवीन फिचरची अॅडिशन करत आहे. या अॅडवाॅन्स फिचरमुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तुमचा अवतार आणखीन आकर्षक आणि आपलंस वाटणार आहे.

Also Read  ChatGPT:च्या सीईओ सॅम अल्टमॅन यांच्या सहमतीसह, कृत्रिम बुद्धीमत्तेच्या तंत्रज्ञानाने जगातील चिंतेची वाढ आहे.

असं आहे नवीन अपडेट Faceebok Update:

अवतारचं नवीन फिचर फेसबुक आणि इन्स्टाग्रामशी जोडलेलं असेल. त्यामुळे या प्लॅटफाॅर्मवर अवतार सेक्शनमध्ये काही अपडेट देणार असल्याचं समजतं. यामध्ये काही  हेअर स्टाईलचा कलर,  बाॅडीचे वेगवेगळे प्रकार आणि  आणि ड्रेसिंगशी संबंधित काही नवीन अपडेट उपलब्ध करून देणार आहे.  यामुळे आता यूजर्स स्वत:च्या अवताराला आणखीन चांगल्या पद्धतीनं सादर करू शकतील. यासाठी  मेटानं प्युमा (PUMA)सारख्या कंपनीसोबत करारही केला आहे. यासंबंधित आणखीन काही नवीन ड्रेसिंग अपडेट अॅपवर उपलब्ध होणार असल्याचं समजतं. यासाठी यूजर्सना सात वेगवेगळे ड्रेसिंग अपडेट पाहायला मिळू शकतात. यासोबत मानवी बॉडीचे वेगवेगळे प्रकार, हेअर कलर आणि आयलॅशेज (पापण्या) यासारखे अनेक नवीन पर्याय उपलब्ध असणार आहेत असं मेटानं त्यांच्या एका ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. मेटानं नुकतच त्यांचं नवीन अपडेट सादर केलं आहे. तसेच अवतारचे सर्व नवीन फीचर लोकांना लवकरच उपलब्ध होतील. हे येत्या काही दिवसात दिसून येईल. या फीचरबद्दल बहुतांश यूजर्सना प्रचंड उत्सुकता आहे.

Also Read  WhatsApp च्या नवीन फिचर्समुळे कसा फायदा होईल?

आता इन्स्टाग्राम आणि फेसबूकवरही पैसे देऊन ब्लू टिक मिळणार

सध्या ट्विटरने ब्लू टिकसाठी पेड मेंबरशिप सुरू केल्याचं सर्व युजर्सना माहिती आहे. अगदी यासारखंच मेटा या कंपनीनं इन्स्टाग्राम आणि फेसबूकसाठी पेड मेंबरशिपची घोषणा केली होती. आता इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर ब्लू टिक मिळविण्यासाठी वेब युजर्सना दर महिन्याला 1,099 रूपये आणि अॅंड्रॉईड, आयओएस (IOS) युजर्सना 1,499 रूपये इतक पैसे मोजावे लागणार आहे. यासाठी मेटाच्या प्लॅटफाॅर्मवर युजर्सना आधी पेमेंट करावं लागेल आणि स्वत:चं ओळखपत्र अपलोड केल्यानंतर यूजर्सना ब्लू टिक उपलब्ध होणार आहे.  यामुळे युजर्सना अनेक सुविधाही उपलब्ध होणार आहेत.

Also Read  Twitter Advance Search : आता ब्लू टिक, गोल्ड टिकमार्कसाठी इतके पैसे मोजावे लागणार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp वर Delete केलेले मेसेज कसे पाहायचे ?