- Mint Face Pack: उन्हाळा सुरू होताच थंड पदार्थांचा समावेश आपल्या आहारात सुरू होतो. पुदिना हा उन्हाळ्याच्या दिवसांत वापरला जाणारा महत्त्वाचा पदार्थ आहे. परंतु खाण्याबरोबरचं पुदिना (mint) आपले सौंदर्य(beauty) वाढविण्यासाठी देखील उपयुक्त आहे. पुदिन्यामुळे चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात. पुदिन्यामध्ये अनेक पोषणतत्वे असतात जे त्वचेसाठी उपयुक्त ठरतात. यामधील ‘अ’ जीवनसत्त्व असलेले अँटीबॅक्टिरिअल गुण चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. जर तुम्हालाही उन्हाळ्यात आपला चेहरा फ्रेश ठेवायचा असेल तर हे फेसपॅक(facepack) नक्की वापरून पहा.
पुदिना आणि काकडीचा फेसपॅक
उन्हाळ्याच्या दिवसांत पुदिना (Mint Facepack) आणि काकडीचा वापर खूप फायदेशीर ठरतो.फक्त जेवणातच नाही तर याचा उपयोग आपण चेहऱ्यासाठी सुध्दा करु शकतो.यामुळे चेहरा स्वच्छ होऊन थंडावा निर्माण होतो.हा फेसपॅक तयार करण्यासाठी पुदिन्याची ताजी पानं घ्यावीत आणि काकड्या घ्याव्यात. काकड्यांचा किस करून त्यातील रस काढून घ्यावा. नंतर काकडीच्या रस आणि पुदिन्याच्या पानांचे एकत्रित मिश्रण करावे. हे मिश्रण संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावावे आणि 20 मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा.
पुदिना, तुळस आणि कडुलिंबाचा पॅक
उन्हाळ्यात पुदिना (Mint) आणि तुळशीचा पॅकसुध्दा त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यासाठी पुदिना, तुळस आणि कडुलिंबाची ताजी पानं घ्यावीत. यासर्वांचे एकत्रित मिश्रण करावे आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावावे. अर्ध्या तासानी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा.
पुदिना आणि मुल्तानी मातीचा फेसपॅक
उन्हाळ्यात मुल्तानीचा मातीचा वापर फेसपॅक म्हणून केला जातो. पण जर यात पुदिन्याचा वापर केला तर तुमच्या सौंदर्यात अजून भर पडेल. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणादेखील कमी होण्यास मदत होईल. हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी पुदिन्याची पानं बारीक वाटून घ्यावीत.त्यात एक चमचा मुल्तानी माती घालून मिश्रण एकत्रित करून घ्यावे. त्यात थोडं दही किंवा मध घालावं.आता हे मिश्रण संपुर्ण चेहऱ्यावर लावून घ्यावे. 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. घामामुळे होणारा चिकटपणादेखील याने दूर होण्यास मदत होईल. दिन्यामुळे चेहऱ्याला अनेक फायदे मिळतात.
Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संबंधित बातम्या :
Coconut Water Benefits: नारळ पाणी पिण्याचे फायदे काय? नारळ पाणी कधी प्यायचं?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )